शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:29 IST

पूर्णेकर हत्या प्रकरणात फरार संतोष कनोजिया प्रयागराजमध्ये अटकेत, हेल्मेटधारी अमित सिंगही पकडला

पूर्णेकर हत्या प्रकरणात फरार संतोष कनोजिया प्रयागराजमध्ये अटकेत, हेल्मेटधारी अमित सिंगही पकडला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या बहुचर्चित प्रकरणात फरार असलेला चौथा आरोपी संतोष कनोजिया उर्फ 'टल्ली' याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने प्रयागराजमधील एका मंदिराबाहेरून त्याला शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे पोलीस तपासाला वेग आला आहे.

पूर्णेकर यांची हत्या झाल्यापासून संतोष कनोजिया सतत आपले ठिकाण बदलत राहून पोलिसांना गुंगारा देत होता, असे सांगण्यात आले. ठाणे पोलिसांचे एक पथक गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होते. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो प्रयागराजमधील एका मंदिरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

शनिवारी (10 ऑक्टोबर 2026) ठाणे क्राईम ब्रँचचे पथक आरोपीला घेऊन ठाण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.

या हत्येत हेल्मेट घातलेला आरोपी म्हणून ज्याचा उल्लेख होत होता, तो अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू हाही एसआयटी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. शुक्रवारी (9 ऑक्टोबर 2026) संध्याकाळी एसआयटी पथकाने या दोघांना अटक केली. अमित सिंग हा रिक्षा चालक असून तो भाईंदर येथे राहतो. त्याचे मूळ गाव बाबियाव, पोस्ट चोलापूर, जिल्हा बनारस येथील आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली याचे मूळ गाव गहनी, पोस्ट अय्यर, जिल्हा बनारस असे आहे.

हत्येनंतर हे दोघेही फरार झाले होते. ते आपल्या मूळ गावी गेले असावेत, या शक्यतेने पोलीस पथक उत्तरप्रदेश आणि भारत-नेपाळ सीमेवर दोघांचा शोध घेत होते. या शोधादरम्यान एसआयटी पथकाला संतोष कनोजिया सापडला. त्याचा मित्र असलेला हेल्मेटधारी आरोपी अमित सिंग हाही बनारस येथून सापडला. एसआयटी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना 10 ऑक्टोबर 2026 रोजी ठाण्यात आणण्यात येणार आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हत्येमागील नेमके राजकीय किंवा वैयक्तिक कारण काय, हे अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाही. संतोष कनोजियाच्या अटकेमुळे हत्येची सुपारी कुणी दिली, कट कसा रचण्यात आला आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमका मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही आरोपींना अटक झाल्याने आता या हत्येमागील रहस्य उघड होईल, अशी अपेक्षा आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ