सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
13:16 IST

पेन्शन कार्डच्या मेसेजची लिंक उघडली आणि पाषाणच्या ज्येष्ठाचे 4 लाख 81 हजार गेले

पाषाणमधील 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची व्हॉट्सॲपवरील मेसेजमुळे फसवणूक झाली. बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

पेन्शन कार्डच्या मेसेजची लिंक उघडली आणि पाषाणच्या ज्येष्ठाचे 4 लाख 81 हजार गेले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यात सायबर फसवणुकीचे आणखी दोन प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन युक्त्या दिवसेंदिवस वाढत असून आता त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करायला सुरुवात केल्याचे या घटनांतून दिसते. पाषाण परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन कार्डच्या नोंदणीच्या नावाखाली आलेला मेसेज चांगलाच महागात पडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप एकनाथ वाईकर (वय 70, रा. पाषाण, पुणे) यांना 8 ते 9 सप्टेंबर 2026 या दरम्यान व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. त्यात पेन्शन कार्डची नोंदणी करण्याचे आमिष दाखवले होते. मेसेजमधील लिंक उघडल्यानंतर तिथे बँक खात्याशी संबंधित जी गोपनीय माहिती विचारली होती, ती वाईकर यांनी भरली.

माहिती भरताच काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 81 हजार रुपयांची रक्कम परस्पर गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली आहे हे कळल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस सायबर सेलच्या मदतीने अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कोथरूड परिसरातील एका महिलेची ऑनलाइन फसवणूक झाली. विनिता विनोद कुलकर्णी (वय 64, रा. गौरीहर सोसायटी, डावी भुसारी कॉलनी, कोथरूड) यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपवर संपर्क केला. आपण रुबी हॉल रुग्णालयातून बोलत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट देण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने त्यांची 59 हजार 400 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी ज्येष्ठांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. व्हॉट्सॲप, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर पेन्शन, सरकारी योजना किंवा लॉटरीबद्दल अनोळखी किंवा संशयास्पद लिंक आली, तर तिच्यावर चुकूनही क्लिक करू नये. कोणतेही शासकीय कार्यालय, बँक किंवा पेन्शन विभाग फोनवर किंवा मेसेजमधील लिंकद्वारे खाते क्रमांक, पासवर्ड, पिन, एटीएम कार्ड किंवा OTP कधीही विचारत नाही. त्यामुळे अशी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा नोंदणी करायची असेल, तर संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, मेसेजवर विश्वास ठेवू नये. मोबाईलवर आमिष दाखवणारा किंवा संशयास्पद मेसेज आला, तर कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी घरातील तरुण सदस्यांना किंवा नातेवाईकांना तो दाखवून खात्री करून घ्यावी. चुकून फसवणूक झालीच, तर घाबरून न जाता लगेच सायबर क्रांतीच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर मदत घ्यावी.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ