सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
13:42 IST

जुहूत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुन्हेगारांना शोधून काढू

मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाला. बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्याची माहिती असून मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे.

जुहूत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुन्हेगारांना शोधून काढू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. फुटबॉल मॅच खेळून झाल्यावर अभिनेता घरी जात असताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. काही व्हिडीओमध्ये गोळीबार करताना हे हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत. टायगर श्रॉफवरील या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याची माहिती आहे.

या गोळीबारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे, त्यांचे आकाही शोधून काढतील. त्यामुळे मी निश्चितपणे सांगेन की, अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. पोलिसांना उघडपणे कोणी चॅलेंज देऊ शकत नाही," असा इशारा फडणवीस यांनी दिला.

"हे डरपोक लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून वल्गना करतात. त्यांच्यात हिम्मत नाही. हे एकप्रकारे भाड्याचे लोक आहेत. भाड्याच्या लोकांच्या आधारावर ऑपरेट करणारे लोक आहेत," असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, "निश्चितपणे पोलिसांपुढे यात चॅलेंज येते, ते म्हणजे हे लोक महाराष्ट्रातून ऑपरेट करत नाहीत. देशाच्या बाहेरून ऑपरेट करतात. केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्र आणि देशाबाहेरून ऑपरेट करणाऱ्या या गँगना मुंबई पोलीस नेस्तनाबूत करतील."

"अशा कुठल्याही गँगला घाबरण्याचे कारण नाही. हे डरपोक लोकांचे कार्य आहे. हे घाबरणारे लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून कम्युनिकेशनचा वापर करून धमक्या देत असतात. आम्ही प्रत्येक धमकी गांभीर्याने घेतो," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

"मुंबई पोलीस प्रोफेशनल पोलीस फोर्स आहे. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिले आहे की, अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत, त्यांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे सांगेन, कोणी घाबरण्याचे कारण नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"शेवटी घटना गंभीर आहे, या घटनेच्या अनुषंगाने जे जे करण्याची गरज आहे, ते ते केले जाईल. टायगर श्रॉफ यांना सुरक्षा आहे. त्यांनी ती सुरक्षा काही कारणाने मागे ठेवली होती. त्यांच्यासोबत सुरक्षा कवच नव्हते. अशावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्या संदर्भातील माहिती पुढे येईल," असेही फडणवीस यांनी सांगितले.

"टायगर श्रॉफ यांच्याशी माझे बोलणे झाले. मी त्यांना आश्वस्त केले आहे की त्यांनी कुठलीही चिंता करू नये. ज्यांनी हे केले आहे, त्यांना आम्ही शोधून काढणार," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ