सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
08:25 IST

फेरेरोच्या किंडरने आणली दिवाळीसाठी 'हॅप्पीनेस टाइम्स' गिफ्टिंग सिरीज

किंडर या ब्रँडने रॉकेट, अनार आणि कंदिलाच्या आकारातील तीन फेस्टिव्ह गिफ्ट पॅक्स बाजारात आणले आहेत.

फेरेरोच्या किंडरने आणली दिवाळीसाठी 'हॅप्पीनेस टाइम्स' गिफ्टिंग सिरीज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पॅकेज्ड मिठाई क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी फेरेरो हिचा लोकप्रिय कन्फेक्शनरी ब्रँड किंडर यंदाच्या दिवाळीसाठी सज्ज झाला आहे. ब्रँडने नुकतीच 'किंडर हॅप्पीनेस टाइम्स' ही खास फेस्टिव्ह गिफ्टिंग सिरीज सादर केली आहे.

नव्या पिढीला दिवाळीच्या परंपरा, त्यामागच्या रंजक गोष्टी आणि सणाचे महत्त्व खेळता-खेळता कळावे, या हेतूने ही भेटवस्तूंची श्रेणी तयार करण्यात आली आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा मुलांपर्यंत पोहोचवण्यात पालकांची भूमिका सर्वात मोलाची असते, हे लक्षात घेऊन किंडरने दिवाळीच्या पारंपरिक चालीरीतींना मजेशीर खेळाचे रूप दिले आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाला सणाचा मनमुराद आनंद घेता येईल.

बाजारात मिळणाऱ्या नेहमीच्या चौकोनी गिफ्ट बॉक्सच्या पलीकडे जात किंडरने हे पाऊल उचलले आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण असलेल्या रॉकेट, अनार आणि कंदील यांच्या आकारावरून प्रेरणा घेऊन तीन फेस्टिव्ह पॅक्सची ही सिरीज आहे. त्यात किंडर जॉय, किंडर क्रीमी आणि किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी यांचा समावेश आहे.

प्रत्येक पॅक किंडरच्या लोकप्रिय चवीला दिवाळीचा खास ट्विस्ट देतो. सोबत असलेल्या रंजक गोष्टी, माहिती आणि छोट्या-मोठ्या अॅक्टिव्हिटींमुळे कुटुंबाला सणाच्या परंपरा नव्याने अनुभवता येतात. पालक आणि मुलांनी एकत्र येऊन खेळत, शिकत आणि निवांत क्षण घालवत दिवाळीच्या परंपरा जाणून घ्याव्यात, हा यामागचा मुख्य विचार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या हस्ते या गिफ्टिंग सिरीजचे अनावरण झाले. "त्योहारों को बनाये खास, किंडर के साथ" हा ब्रँडचा फेस्टिव्ह मंत्र तिथे प्रत्यक्ष अनुभवातून मांडण्यात आला. रांगोळी, तोरण, पणत्या, कंदील, फुलांचे हार आणि मिठाई अशा सर्व पारंपरिक घटकांना 'किंडर हॅप्पीनेस टाइम्स'च्या उत्साहाची जोड देण्यात आली होती.

किंडर फेस्टिव्ह होमच्या माध्यमातून सणांच्या परंपरा फक्त दुरून न पाहता त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येईल, अशी व्यवस्था केली आहे. कुटुंबांसाठी तयार केलेल्या या वॉक-थ्रू सफरीत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवाळीची एखादी परंपरा अनुभवता येते. रांगोळी काढणे, पाना-फुलांचे तोरण गुंफणे, अंगणात पणत्या लावणे, कंदील सजवणे आणि फुलांच्या माळा लावणे अशा आनंददायी प्रवासाने घराची सुरुवात होते. १० ते २४ ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेला हा किंडर दिवाळी अनुभव सर्वांसाठी खुला आहे.

फेरेरो इंडियाचे मार्केटिंग हेड जोहर कापूसवाला म्हणाले, "दिवाळी म्हणजे परंपरा, सुरेख गोष्टी आणि कुटुंबासोबत निवांत घालवलेले आनंदाचे क्षण. 'किंडर हॅप्पीनेस टाइम्स' गिफ्टिंग सिरीजच्या माध्यमातून आम्हाला याच पारंपरिक भावनांना उजाळा द्यायचा आहे. रॉकेट, अनार आणि कंदिलाच्या अनोख्या आकारातील हे गिफ्ट पॅक्स किंडरच्या गोडव्यात दिवाळीचा उत्साह आणतात, तर किंडर फेस्टिव्ह होमच्या माध्यमातून कुटुंबे स्वतः सहभागी होऊन सणाचा आनंद घेऊ शकतात. करिश्मा कपूर यांच्या उत्साही उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. आम्हाला खात्री आहे की, 'किंडर हॅप्पीनेस टाइम्स' यंदाच्या दिवाळी साजरीकरणाचा अविभाज्य भाग बनेल."

आकर्षक पॅकेजिंगसह हे किंडर हॅप्पीनेस पॅक्स आता देशभरातील पारंपरिक किराणा दुकाने, आधुनिक ट्रेड आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ