मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 18:39 IST

नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू; अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता

विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नागपुरात अनेक मतदारांनी पसंतीक्रमाऐवजी टिकमार्क केल्याने अवैध मतं वाढण्याची शक्यता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू; अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नागपुरातल्या मानकापूर क्रीडा संकुलात सकाळी 8 वाजल्यापासून हे काम सुरू आहे. विधान परिषदेच्या एकूण 5 जागांसाठी, म्हणजेच राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत 182 उमेदवार रिंगणात होते आणि त्यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

या सगळ्यात नागपूरच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे. त्याचं कारण असं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही प्रचारात उतरून ही लढत चुरशीची केली होती. मतदारांनी आपला कौल भाजपचे सुधाकर कोहळे यांना दिला की काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना, हे आता निकालातच कळेल.

या मतदारसंघात 64.76 टक्के मतदान झालं आहे. एकूण 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदान केलं. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय झालं, ते पाहिलं तर मतदारांनी मतदान करून टाकलेल्या मतपेट्या मतमोजणी केंद्रात तयार केलेल्या हौदांमध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर मतपत्रिकांचे 25-25 चे गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणी पूर्ण करण्याआधी हे 25-25 चे गठ्ठे एका टेबलवर हजार गठ्ठे या प्रमाणात ठेवले जाणार आहेत. पहिल्या फेरीत 84 हजार मतांची मोजणी होणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर पोस्टल मतांची मोजणीही सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली नव्हती, पण मतमोजणीआधीची प्रक्रिया आधी सुरू झाली आहे.

दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम 1 असा क्रमांक लिहिण्याऐवजी टिकमार्क (yes) केल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदानात अवैध मतांचा आकडा मोठा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तिकडे अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान 25-25 मतपत्रिकांच्या दुसऱ्या फेरीचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून त्यात 14 मतपेट्यांमधल्या मतपत्रिका काढून गठ्ठे लावले जाणार आहेत. एकूण सहा फेऱ्या होतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती आहे.

#नागपूर#विधानपरिषदचुनाव#PT24#NagpurMLCElection#Nagpur

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ