मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 19:28 IST

जयपूरमध्ये फुटपाथवर चालणाऱ्या तीन मित्रांनी बाईकस्वारांना थांबवले, व्हिडीओ व्हायरल

फुटपाथवरून बाईक चालवणाऱ्यांना तीन मित्रांनी भांडण न करता शांतपणे मागे ठेवले; सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस.

जयपूरमध्ये फुटपाथवर चालणाऱ्या तीन मित्रांनी बाईकस्वारांना थांबवले, व्हिडीओ व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

फुटपाथ हा चालणाऱ्या माणसांसाठी असतो. पण संध्याकाळी गर्दीच्या वेळेला काही दुचाकीस्वार मुद्दाम आपली गाडी फुटपाथवरून घालतात आणि पादचाऱ्यांना चालणे अवघड होते. अशाच लोकांना चांगला धडा देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही तरुणांनी दुचाकीस्वारांची चांगलीच जिरवली आहे.

हा व्हिडीओ jaipur_raj221 नावाच्या पेजने इंस्टाग्रामवर टाकला. त्यावरून ही घटना राजस्थानमध्ये घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्हिडीओत तीन मित्र अगदी आरामात फुटपाथवर गप्पा मारत चालले आहेत आणि त्यांच्यापुढचा रस्ता पूर्ण रिकामा आहे. त्यांच्या मागे चार ते पाच बाईकवाले आहेत, पण त्यांना पुढे जाता येत नाही.

आपण सहसा काय करतो? गाडीला घाबरून किंवा हॉर्न वाजला की बाजूला होतो आणि गाड्यांना जागा देतो. पण या मुलांनी तसे केले नाही. फुटपाथचा खरा अर्थ त्यांनी त्या बाईकवाल्यांना कृतीतून सांगितला. तुम्ही चुकीच्या जागी आला आहात, तर तुम्हीच थांबा, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे बाईकवाल्यांना त्यांच्या मागे हळूहळू जावे लागले. हॉर्न वाजवूनही काही उपयोग झाला नाही आणि शेवटी त्यांना गप्प मागेच राहावे लागले.

या मित्रांनी कुणालाही मारहाण केली नाही, शिवीगाळ केली नाही आणि आरडाओरडाही केला नाही. फक्त शांतपणे आपला हक्क गाजवला. त्यांनी शांतपणे बाईकवाल्यांना त्यांची चूक दाखवून दिली. महात्मा गांधी यांच्यासारखा अहिंसेचा मार्ग त्यांनी वापरला, असे म्हटले जात आहे. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

कमेंट्समध्ये लोकांनी काय म्हटले, तेही पाहण्यासारखे आहे. एका जणाने लिहिले की, मित्रांनो, तुम्ही जे केले ते एक नंबर आहे. दुसरा म्हणतो की, अजून हळू चला, म्हणजे त्यांना अद्दल घडेल. एका नेटकऱ्याने लिहिले की, हे प्रत्येक शहरात झाले पाहिजे. मुंबई असो किंवा पुणे, सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे.

फुटपाथवर कधीकधी चालायला जागाच नसते, असेही एका कमेंटमध्ये म्हटले आहे. कधी गाड्या पार्क केलेल्या असतात, कधी दुकानाचे सामान ठेवलेले असते आणि कधी अशा बाईक पळवल्या जातात. फुटपाथवर बाईक चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे, पकडले तर दंड होतो, असेही कमेंट करणाऱ्याने म्हटले आहे. पण पोलीस प्रत्येक ठिकाणी नसतात आणि त्याचा गैरफायदा हे लोक घेतात. अशा वेळी या तरुणांनी दाखवलेली हिंमत खरोखरच कौतुकास्पद आहे. आपला हक्क मागण्यासाठी भांडणच केले पाहिजे असे नाही, हे त्यांनी दाखवून दिले, असेही नेटकरी लिहितात.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ