मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

नागपुरात हेडगेवार फ्लायओव्हरचं उद्घाटन; तासाभराचा प्रवास आता 10 मिनिटांत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील इंदोरा चौक ते दिघोरी या सर्वात लांब उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं.

नागपुरात हेडगेवार फ्लायओव्हरचं उद्घाटन; तासाभराचा प्रवास आता 10 मिनिटांत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नागपुरात एक नवा उड्डाणपूल सुरू झाला असून तो सध्या देशभर चर्चेचा विषय बनला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन पार पडलं. इंदोरा चौक ते दिघोरी असा हा पूल अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्स्ड काँक्रिट म्हणजेच UHPFRC या तंत्रज्ञानाने बनवला असून तो इको फ्रेंडली आहे. नॅशनल हायवे नंबर 353D वर उभारलेला हा पूल सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा असून त्याने नागपूरचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग एकमेकांना जोडला आहे. नागपुरातील हा आतापर्यंतचा सर्वात लांब आणि सर्वात महागडा एलिव्हेटेड कॉरिडोअर ठरला आहे. या पुलामुळे आधी तासभर लागणारा प्रवास आता अवघ्या 10 मिनिटांत होणार आहे.

नागपूरच्या सुरेश भट्ट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी या पुलाची वैशिष्ट्ये सांगितली. UHPFRC तंत्रज्ञान वापरल्यामुळे दोन खांबांमध्ये मोठा स्पॅन तयार करणं आव्हानात्मक होतं, त्यामुळे स्ट्रक्चरल सेगमेंटची एकच जोडी वापरण्यात आली. यामुळे आधारांची म्हणजेच सपोर्टची संख्या कमी लागली आणि पुलाचं बांधकाम वेगाने पूर्ण होऊ शकलं, असं गडकरी म्हणाले. इंदोरा ते दिघोरी हे अंतर आधी रस्तेमार्गे कापायला जवळपास एक तास लागत असे, ते आता 10 ते 15 मिनिटांत पार करता येईल. या पुलाचं बांधकाम नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने केलं असून त्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

पुलाच्या रचनेबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, हा पूल अशोक स्क्वॉयरवर पाच दिशांना जोडला जातो. या जंक्शनवर एक अशोक स्तंभ उभारण्यात आला असून संविधानाची थीम असलेली पेंटिंग आणि आकर्षक लायटिंगही करण्यात आली आहे. या कॉरिडोअरमुळे सध्याच्या रस्त्यांची नावं बदलण्यात आलेली नाहीत. हे एक मल्टि-लेअर्ड स्ट्रक्चर असून तीन असो वा चार लेअर, त्यामुळे नागपूरला एक खास ओळख मिळाल्याचं ते म्हणाले.

इंदोरा चौक ते पंचपाओली चौकापर्यंतच्या रस्त्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हे नाव कायम राहणार असून फक्त उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवार फ्लायओव्हर हे नाव देण्यात आलं आहे. अशोक चौकाचं नावही अशोक चौकच राहणार असून या चौकाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. रेशमबाग चौकाचं नाव जनरल मंचरशा अवारी चौक हेच कायम राहील, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

डागा हॉस्पिटल, रेशमबाग चौक आणि बडा ताजबाग या तीन ठिकाणी रँप तयार करण्यात आले आहेत. यामुळे गांधीबाग आणि पंचपाओलीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अग्रसेन चौकावर मेट्रो कॉरिडोअरच्या वर एलिव्हेटेड पॅसेज उभारण्यात आला असून त्यामुळे मल्टी लेन ट्रॅफिक मूव्हमेंट सुलभ होईल. नागपुरातील वर्धा रोड आणि कामठी रोडवर जशी व्यवस्था आहे, तशीच व्यवस्था इथेही केली जाणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघाचे संस्थापक व सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचं नाव या फ्लायओव्हरला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शहरात पर्यावरण अनुकूल प्रकल्प सुरू असून यामुळे भविष्यात नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरच्या चारही बाजूंनी 148 किलोमीटर लांबीचा गोल्डन आर्च रिंग रोड बांधला जात असून त्यामुळे शहराचा विस्तार होणार आहे. सध्या नागपुरात 35 उड्डाणपूल असून आणखी 15 उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या पायाभूत सुविधांमुळे नागपूरचा विकास अधिक वेगाने होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ