सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 10:45 IST

नागपुरात गरबा कार्यक्रमातील वादातून तरुणावर चाकूहल्ला; दोघांना अटक

गरबा कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या रागातून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. अजनी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

नागपुरात गरबा कार्यक्रमातील वादातून तरुणावर चाकूहल्ला; दोघांना अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूरमध्ये गरबा कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या रागातून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मनीषनगर परिसरातील रुद्र बारजवळ असलेल्या सुरेश ग्राउंड येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार घडला. या हल्ल्यात अथर्व वाडीभस्मे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी अजनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरच्या रात्री सुरेश ग्राउंड येथे गरबा कार्यक्रम सुरू होता. त्या वेळी काही तरुण दारू पिऊन कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ करत होते, असा आरोप आहे. त्यामुळे तिथल्या बाऊन्सरच्या मदतीने त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. याच कारणावरून तक्रारदार कृष्णा बराडिया आणि संबंधित तरुणांमध्ये वाद झाला. त्यानंतर ते तरुण तिथून निघून गेले.

मात्र, हा वाद तिथेच थांबला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस ढेंगे याने तक्रारदाराला फोन करून, त्यांचा मित्र अथर्व वाडीभस्मे याच्यासह घटनास्थळी बोलावले, असा आरोप आहे. त्यानंतर गरबा कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद उफाळला. याच दरम्यान अथर्ववर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या छातीवर दोन ते तीन वार करण्यात आले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

जखमी अथर्वला सुरुवातीला तायवाडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अजनी पोलिसांनी तेजस ढेंगे आणि अल्ताफ आलम अन्सारी यांना अटक केली आहे. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून, पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजनी पोलीस करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ