शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:11 IST

महिंद्राची पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार XUV 3XO ZNG लॉन्च, किंमत 9.99 लाखांपासून

महिंद्राने आपली पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार 'Mahindra XUV 3XO ZNG' अधिकृतपणे लॉन्च केली असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.

महिंद्राची पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार XUV 3XO ZNG लॉन्च, किंमत 9.99 लाखांपासून छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्राने भारतीय बाजारात आपली पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार अधिकृतपणे लॉन्च केली आहे. लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV असलेल्या महिंद्रा XUV 3XO ची ही सीएनजी आवृत्ती असून कंपनीने तिला 'Mahindra XUV 3XO ZNG' या नव्या नावाने बाजारात आणले आहे. पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिकनंतर आता महिंद्राने सीएनजी सेगमेंटमध्येही दमदार पाऊल ठेवले आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ही देशातील सर्वात पॉवरफुल सीएनजी कार ठरली आहे. या नव्या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटरचे TCMPFi टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन सीएनजी मोडवरही 114 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार प्रति किलो 24.7 किलोमीटर मायलेज देते. तसेच ही एसयूव्ही 0 ते 100 किमी / ताशी वेग अवघ्या 11.8 सेकंदात गाठू शकते.

पारंपरिक सीएनजी गाड्यांमध्ये डिकीची जागा अपुरी पडते, पण या कारमध्ये तसे होत नाही. टाटा नेक्सॉन आयसीएनजीप्रमाणेच महिंद्राने यात ड्युअल-सिलिंडर टेक्नॉलॉजी वापरली आहे. म्हणजे एकाच मोठ्या सिलिंडरऐवजी दोन छोटे सिलिंडर बूट फ्लोरच्या खाली बसवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना 270 लिटरचे बूट स्पेस मिळते. कारची स्टेपनी (स्पेयर व्हील) खाली बसवण्यात आली आहे. डॅशबोर्डवर सीएनजी-पेट्रोल स्विच दिला असून डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दोन्ही इंधनांची लेव्हल एकत्र दिसते.

फीचर्सच्या बाबतीत या एसयूव्हीमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10.35 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरामिक सनरूफ, लेदरेट सीट्स आणि डॉल्बी अॅटमॉस साऊंड सिस्टीम अशी अनेक प्रीमियम फीचर्स मिळतात. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, चारही चाकांना डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि मजबूत रिइन्फोर्स्ड चेसिस देण्यात आली आहे.

व्हेरिएंटनुसार किमती अशा आहेत: MX Edge ZNG ची किंमत 9.99 लाख रुपये आहे. REVX Edge (O) ZNG ची किंमत 10.79 लाख रुपये, AX5 ZNG ची 11.19 लाख रुपये, तर टॉप मॉडेल असलेल्या REVX A ZNG ची किंमत 12.27 लाख रुपये आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ