बीवायडीची नवी फ्लॅगशिप सेडान 'दा हान ईवी' चीनमध्ये लॉन्च; एका चार्जमध्ये 1008 किलोमीटर रेंज
बीवायडीने आपली नवी फ्लॅगशिप सेडान 'दा हान ईवी' चीनमध्ये अधिकृतपणे लॉन्च केली आहे. बॅटरी 9 मिनिटांत 10 टक्क्यांपासून 97 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चीनमधील दिग्गज इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बीवायडीने (BYD) आपली नवीन फ्लॅगशिप सेडान कार 'दा हान ईवी' (Da Han EV) चीनमध्ये अधिकृतपणे लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि जबरदस्त फीचर्समुळे ही कार सध्या ऑटोमोबाईल विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची रेंज आहे. कारचा बेस मॉडेल एका चार्जमध्ये तब्बल 1008 किलोमीटर (CLTC) ची विक्रमी रेंज देतो. परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही कार भारी आहे. तिचे सिंगल-मोटर (RWD) व्हर्जन 496 hp पॉवर जनरेट करते आणि अवघ्या 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठते. तसेच, तिचे शक्तिशाली डुअल-मोटर (AWD) व्हर्जन 764 hp पॉवर आणि 910 Nm टॉर्कसह 3.3 सेकंदातच 100 किमी/ताशी वेग गाठते.
विशेष म्हणजे, या कारमध्ये कंपनीची प्रगत फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. त्यामुळे कारची बॅटरी अवघ्या 9 मिनिटांत 10 टक्क्यांपासून 97 टक्क्यांपर्यंत फुल चार्ज होऊ शकते. सुरक्षेसाठी यात 'God's Eye 5.0' ड्रायव्हिंग सिस्टीम आणि 'DiSus-A' डुअल-चेंबर एअर सस्पेंशन मिळते.
लूक आणि साईजबद्दल सांगायचे तर, या इलेक्ट्रिक कारच्या पुढील भागात 2.41 मीटर लांबीची इंटिग्रेटेड DRL लाईट स्ट्रिप दिली आहे, ज्यामध्ये 249 LED बीड्स आहेत. कारच्या एरोडायनामिक डिझाईनमुळे तिचा ड्रॅग कोएफिशिएंट (drag coefficient) अवघा 0.197 इतका आहे.
ही एक मोठी लक्झरी इलेक्ट्रिक सेडान असून तिची लांबी 5256 मिमी, रुंदी 1999 मिमी, उंची 1510 मिमी आणि व्हीलबेस 3130 मिमी आहे. स्टँडर्ड म्हणून रिअर-व्हील स्टीयरिंग दिले आहे, ज्यामुळे एवढ्या मोठ्या सेडानचा टर्निंग रेडियस केवळ 4.95 मीटर राहतो.
कारच्या केबिनमध्ये 40 इंचाचा AR-HUD, 17.3 इंचाची सेंट्रल स्क्रीन आणि 31 स्पीकर्सची डेव्हिलेट (Devialet) साऊंड सिस्टीम दिली आहे. चीनमध्ये या शानदार सेडानची सुरुवातीची किंमत 2,35,900 युआन (अंदाजे 29.5 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.