बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

किया इंडियाची बायबॅक योजना: ३ वर्षांनंतर आयसीईवर ७५ टक्के, ईव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत रिसेल व्हॅल्यूची हमी

किया इंडियाने आयसीई, हायब्रिड आणि ईव्ही गाड्यांसाठी अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रॅमचा विस्तार केला आहे. पात्र ग्राहकांना ३ वर्षांत आयसीईवर ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत मूल्याची हमी मिळू शकते.

किया इंडियाची बायबॅक योजना: ३ वर्षांनंतर आयसीईवर ७५ टक्के, ईव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत रिसेल व्हॅल्यूची हमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी किया इंडियाने आपल्या आयसीई, हायब्रिड आणि ईव्ही पोर्टफोलिओमध्ये 'अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रॅम'चा विस्तार करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गाडी घेतानाच तिची पुढची किंमत ठरलेली असल्याने गाडी बदलणे किंवा अपग्रेड करणे ग्राहकांना अधिक सुलभ व सोयीस्कर होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

या विस्तारित प्रोग्रामअंतर्गत पात्र ग्राहकांना ३ वर्षांच्या कालावधीत आयसीई मॉडेल्ससाठी ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्ही मॉडेल्ससाठी ७० टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड रेसिड्यूअल व्हॅल्यू, म्हणजेच रिसेल व्हॅल्यूचा लाभ घेता येईल. खरेदीच्या वेळीच भविष्यातील खात्रीशीर मूल्य निश्चित होत असल्याने ग्राहकांना आपल्या गाडीच्या मालकीच्या प्रवासाचे नियोजन अधिक पारदर्शकपणे आणि विश्वासाने करता येणार आहे. मात्र लागू असलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.

या योजनेत किया इंडियाच्या सोनेट, सिरोस, न्यू सेल्टॉस, कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि सोरेंटो या प्रमुख मॉडेल्सचा समावेश आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड आणि ईव्ही अशा सर्व उपलब्ध पॉवरट्रेन पर्यायांना ही योजना लागू असेल.

ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, हे लक्षात घेऊन कालावधीचे लवचिक पर्याय ठेवण्यात आले आहेत. आयसीई मॉडेल्ससाठी ३, ४ किंवा ५ वर्षे, तर ईव्ही मॉडेल्ससाठी ३ किंवा ४ वर्षे निवडता येतील. त्याचबरोबर वर्षाला १०,००० किमी, १५,००० किमी किंवा २०,००० किमी असे मायलेजचे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. संपूर्ण मालकीच्या काळात १,००,००० किमीपर्यंतच्या प्रवासाचा यात समावेश होतो.

किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, "वाहन खरेदी हा एक दीर्घकालीन निर्णय असतो आणि ग्राहक भविष्यातील रीसेल व्हॅल्यू व अपग्रेडच्या सुलभतेबाबत निश्चितता शोधत असतात. ३ वर्षांत आयसीईवर ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्हीसाठी ७० टक्क्यांपर्यंत उद्योगातील सर्वोत्तम पुनर्विक्री मूल्याची (रिसेल व्हॅल्यू) गॅरंटी देऊन आम्ही ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करत आहोत. पहिल्या खरेदीपासून ते पुढील एक्सचेंज किंवा अपग्रेडपर्यंत सातत्यपूर्ण मूल्य देण्याची आमची कटिबद्धता यातून सिद्ध होते."

हा प्रोग्राम कंपनीच्या सर्व अधिकृत किया डीलर भागीदारांमार्फत उपलब्ध करून दिला जाईल. पात्र ग्राहक नवीन गाडी घेताना लागू निकषांनुसार या योजनेत नोंदणी करू शकतात. त्यानंतर निवडलेला कालावधी संपल्यावर अटी व शर्तींनुसार खात्रीशीर बायबॅक मूल्याचा लाभ त्यांना घेता येईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ