बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
01:00  पदवीधर मतमोजणी: टपाली मतांत काँग्रेसचे वंजारी भाजपच्या कोहळेंपेक्षा १५ मतांनी पुढे 27 ऑक्ट | 23:00  नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर, अमरावती शिक्षकमध्ये शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक पुढे 27 ऑक्ट | 18:40  नागपूर पदवीधर मतमोजणी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी 34 टपाली मतपत्रिका अवैध 27 ऑक्ट | 08:40  राज्यात आज बहुतांश भागात पाऊस नाही, पण चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळला यलो अलर्ट 00:10  कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर, चार लाख 15 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी 27 ऑक्ट | 19:16  पाच जागांची मतमोजणी सुरू: पुण्यात 8 मतपेट्या सील नसल्याने मोजणी थांबली, महायुतीची कसोटी
सर्व थेट अपडेट
AQI 154 | Moderate 01:39 IST

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सक्तीची वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना त्यांनी इशारा दिला.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस न पडल्याने पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. शेतकरी हवालदिल झाले असून नापिकीमुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. कर्जाच्या बोजाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी मोठा त्रास सहन करावा लागल्याच्या घटनाही राज्यात घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. आज, मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, "शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. राज्य सरकार 31 ऑक्टोबरला केंद्राला प्रस्ताव पाठवणार आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची वसुली करु नये. कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार. सावकार, फायनान्स कंपनी कोणाचीही गय केली जाणार नाही."

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. चारा लागवडीसाठी हमीभाव जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. शेतकऱ्याला नडणाऱ्याला सोडणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना तातडीची 5 हजार रुपयांची मदत जाहीर झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

याच पत्रकार परिषदेत शिंदे यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. खर्गेंना पक्षातून काढून टाका, असे म्हणत त्यांनी काँग्रेसलाही इशारा दिला.

ते म्हणाले, "खर्गेंना पक्षातून काढून टाका. हा नेपाळ, बांगलादेश नाही तर नवा भारत आहे. खर्गेंच्या मोदींवरील वक्तव्याचा निषेध आहे. मोदी देश जोडणारे आहेत तर विरोधक देश तोडणारे आहेत."

एकीकडे शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आणि दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप, त्यामुळे शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत हे दोन्ही विषय चर्चेत राहिले. आता शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत कधी होते, याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ