मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:50 IST

चेंडू जमिनीवर आपटणे शेफाली वर्माला भोवले, झिम्बाॅम्बेविरुद्धच्या सामन्यात आयसीसीची कारवाई

झिम्बाॅम्बेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेफाली वर्मा हिला आयसीसीने अधिकृत ताकीद दिली असून एक डिमेरिट पॉईंटही नोंदवला आहे.

चेंडू जमिनीवर आपटणे शेफाली वर्माला भोवले, झिम्बाॅम्बेविरुद्धच्या सामन्यात आयसीसीची कारवाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज शेफाली वर्मा हिच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. झिम्बाॅम्बेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिच्याकडून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आयसीसीकडून तिला अधिकृत ताकीद देण्यात आली असून, तिच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एका डिमेरिट पॉईंटचीही नोंद करण्यात आली आहे.

सध्या भारतीय महिला संघ आणि झिम्बाॅम्बे महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. त्यातले दोन सामने झाले असून भारताने ही सिरिज जिंकली आहे. आज रायपूरमध्ये तिसरा, म्हणजेच शेवटचा सामना होणार आहे. त्याआधीच ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेफाली ही भारतीय महिला संघाची स्फोटक फलंदाज म्हणून ओळखली जाते आणि या कारवाईमुळे तिच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात शेफालीकडून खेळाशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे अंपायरच्या निदर्शनास आले. आयसीसीच्या माहितीनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी ठरवून दिलेल्या आचारसंहितेच्या लेवल-१ चे उल्लंघन तिने केले आहे. तिच्यावर अनुच्छेद २.२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडूंनी सामन्यादरम्यान मैदानावर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

ही घटना भारताची गोलंदाजी सुरू असताना 12 व्या ओव्हरमध्ये घडली. श्री चरणी गोलंदाजी करत होती आणि शेफाली मिड ऑफला उभी होती. त्या वेळी फलंदाज चिपो मुगेरी-तिरिपानो हिचा कॅच शेफालीने सोडला. कॅच सुटल्यामुळे तिचे नियंत्रण सुटले आणि रागाच्या भरात तिने चेंडू जमिनीवर फेकून दिला. खेळाच्या नियमांनुसार क्रिकेट साहित्याचा असा गैरवापर करणे किंवा मैदानावर रागाचे प्रदर्शन करणे आचारसंहितेच्या विरुद्ध मानले जाते.

भारतीय महिला संघात स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड यांचा समावेश आहे.

झिम्बॉब्वे महिला संघात केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ