मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:50 IST

मिचेल स्टार्कचा मोठा विक्रम: कसोटीत ४५० बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेणारा जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज ठरला आहे.

मिचेल स्टार्कचा मोठा विक्रम: कसोटीत ४५० बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला आहे. कसोटीत ४५० बळी घेणारा तो जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज ठरला आहे. फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून स्टार्कची ओळख आहे, आणि या कामगिरीमुळे त्याने क्रिकेटच्या क्षेत्रात मोठा इतिहास रचला आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गकेरबाह येथे सुरू आहे. याच सामन्यात स्टार्कने हा ऐतिहासिक पराक्रम केला. हा विक्रम त्याने या मालिकेतच नोंदवला आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात स्टार्कने दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्जकेला अवघ्या ४ धावांवर बाद केले आणि विकेटचे खाते उघडले.

स्टार्कच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या केवळ तीन गोलंदाजांनी कसोटीत ४५० किंवा त्याहून जास्त बळी घेतले आहेत. त्यात शेन वॉर्न, ग्लेन मैक्ग्रा आणि नाथन लायन यांचा समावेश आहे. आता या खास यादीत स्टार्कचेही नाव जोडले गेले आहे. ४५० बळींचा टप्पा गाठणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथाच गोलंदाज ठरला आहे, तर जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज आहे.

स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १९ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून जास्त विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीतील त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ५८ धावांत ७ विकेट्स अशी आहे. त्याने १०९ कसोटी सामन्यांत ४५० विकेट्सचा पल्ला गाठला आहे.

सर्वात वेगाने ४५० बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुथैया मुरलीधरन (श्रीलंका), रविचंद्रन अश्विन (भारत), अनिल कुंबले (भारत), ग्लेन मैक्ग्रा (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) आणि मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ