शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
9 ऑक्ट | 21:53  डिसेंबरमधील सीईटी रद्द, दोन्ही परीक्षा बारावीनंतरच होणार 9 ऑक्ट | 21:46  नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोहा सेवा बंद, परदेशासाठी उरणार फक्त शारजाहचे थेट विमान 9 ऑक्ट | 20:25  दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात; राज्य सरकारकडून प्राथमिक माहिती 9 ऑक्ट | 20:10  दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना धान्य सुरळीत मिळावे, राज्य सरकारचे निर्देश 9 ऑक्ट | 19:55  दारूच्या व्यसनावरून वाद, माजी सरपंचाचा लोखंडी टॉमीच्या हल्ल्यात मृत्यू; आरोप असलेला मुलगा ताब्यात 9 ऑक्ट | 19:53  आणखी ३६ तालुक्यांत दुष्काळाची पाहणी होणार, १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पडताळणी : बावनकुळे
सर्व थेट अपडेट
00:24 IST

मैद्याला बाय-बाय! ज्वारीच्या पिठाचा हेल्दी आणि टेस्टी केक करा घरच्या घरी

विकतच्या केकऐवजी घरी बनवलेला ज्वारीच्या पिठाचा केक लहान मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय ठरतो. त्याची सोपी रेसिपी येथे दिली आहे.

मैद्याला बाय-बाय! ज्वारीच्या पिठाचा हेल्दी आणि टेस्टी केक करा घरच्या घरी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

संध्याकाळच्या वेळी भूक लागली की नेहमीच बाहेरून विकतचे चविष्ट पदार्थ आणून खाल्ले जातात. त्यातही लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे केक. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक उपलब्ध आहेत. पण नेहमी विकतचा केक खाण्याऐवजी घरी बनवलेला हेल्दी आणि टेस्टी केक खाल्लेला बरा. म्हणूनच ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीने असा केक कसा बनवता येतो, ते पाहूया.

मैद्याचे पदार्थ वारंवार खाल्ले तर पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात कमीत कमी मैदा असावा. पचनक्रिया बिघडणे आणि लठ्ठपणा अशा समस्या सुरू झाल्या की शारीरिक आरोग्य बिघडून जाते. म्हणून आहारात ज्वारीच्या पिठाचा समावेश करावा. ज्वारी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते, शिवाय रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. चला तर मग ज्वारीच्या पिठाचा केक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

या केकसाठी साहित्य असे लागेल: ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, झान्थन गम, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ. याशिवाय विरघळवलेले अनसॉल्टेड बटर, तेल, कंडेन्स्ड मिल्क, पिठीसाखर, घट्ट ताजे दही, फुल फॅट दूध, व्हॅनिला एसेंस आणि टुटी-फ्रुटी हेही घ्यावे.

सगळ्यात आधी एका चाळणीत ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोर, कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, झान्थन गम, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ असे सगळे सुके साहित्य टाकावे आणि ते चाळून घ्यावे.

त्यानंतर एका मोठ्या वाटीत विरघळलेले बटर आणि तेल घ्यावे. त्यात कंडेन्स्ड मिल्क, पिठीसाखर, घट्ट दही आणि व्हॅनिला एसेंस घालावे. गुठळ्या मोडून हँड व्हिस्करच्या साहाय्याने हे सगळे नीट फेटून घ्यावे.

हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाले की चाळून घेतलेले सुके साहित्य थोडे-थोडे करून त्यात घालावे आणि हलक्या हाताने मिक्स करावे. आवश्यकता वाटली तर तयार झालेल्या मिश्रणात थोडे-थोडे दूध घालावे आणि केकचे गुळगुळीत बॅटर तयार करावे.

तयार झालेल्या मिश्रणात टुटी-फ्रुटी घालून ते हलक्या हाताने फोल्ड करावे. त्यानंतर चौकोनी केक टीनला थोडे बटर लावावे, त्यात केकचे मिश्रण ओतावे आणि वरून टुटी-फ्रुटी घालून सजवावे.

हा टीन गरम करून घेतलेल्या ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवावा. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवलेला ज्वारीच्या पिठाचा हेल्दी आणि टेस्टी केक तयार होतो. हा केक लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ