शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:38 IST

जिवतीच्या विदर्भ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिवती येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले.

जिवतीच्या विदर्भ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जिवती येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भव्य ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन एस. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालय, जिवती येथील प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे ग्रंथपाल महेंद्र एस. साबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गजानन एस. राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व सांगितले. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे ते म्हणाले. नियमित वाचन केल्याने ज्ञानात भर पडते, विचारशक्ती वाढते आणि व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाचीही सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुण्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी आपल्या मनोगतात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी जीवन, ज्ञानाबद्दलची जिज्ञासा आणि पुस्तकांवरील प्रेम विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, नियमित वाचनाची सवय लावावी आणि ज्ञानाच्या बळावर आपले ध्येय गाठावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल महेंद्र एस. साबळे यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रंथालयात भरवलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट द्यावी आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि ग्रंथालयाचा वापर वाढण्यास प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. डॉ. अमित बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाची सांगता करण्यात आली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ