शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:03 IST

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी, तिसऱ्या हंगामाची प्रक्रिया पूर्ण

जगातील पहिली फ्रँचायझीवर आधारित सुपरक्रॉस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसआरएलच्या तिसऱ्या हंगामासाठी चार रेसिंग गटांत २१ देशांतील १४६ खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी, तिसऱ्या हंगामाची प्रक्रिया पूर्ण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुणे : जगातील पहिली फ्रँचायझीवर आधारित सुपरक्रॉस स्पर्धा असलेल्या 'इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग'ने (आयएसआरएल) आपल्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदाच्या हंगामात २१ देशांतील एकूण १४६ खेळाडूंनी लीगच्या चार रेसिंग गटांत नावे नोंदवली आहेत.

या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धकांसोबतच भारतातील आघाडीचे 'सुपरक्रॉस रायडर्स'ही सहभागी होणार आहेत. म्हणजेच परदेशी आणि भारतीय रायडर्स एकाच लीगमध्ये एकमेकांसमोर उतरतील.

देशानुसार पाहिले तर फ्रान्समधून सर्वाधिक म्हणजे ३२ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातून २० आणि अमेरिकेतून १८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याशिवाय इंडोनेशिया, थायलंड, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, जपान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, स्वीडन, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि मंगोलिया येथील खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या '२५० सीसी - ग्रुप 'ए' फॉरेन बाइक्स ओन्ली इंडियन फ्युचर्स' गटासह '२५० सीसी इंडिया एशिया मिक्स' गटात मिळून भारतातून ३० नोंदणी झाल्या आहेत.

नोंदणी झालेल्या खेळाडूंची गटवार संख्या अशी आहे : '४५० सीसी इंटरनॅशनल' गटात ४०, '२५० सीसी इंटरनॅशनल' गटात ५४ आणि '२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स' गटात २६ खेळाडूंचा समावेश आहे. या नोंदणींमुळे यंदाची स्पर्धा अधिक वैविध्यपूर्ण आणि चुरशीची होणार असल्याचे दिसते.

लीगचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, "लीगचा विस्तार होत असताना जागतिक दर्जाच्या खेळाडूंना आकर्षित करणारी आणि भारतीय रायडर्सना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देणारी व्यावसायिक क्रीडा व्यवस्था उभी करण्यावर आमचा भर कायम राहणार आहे."

'आयएसआरएल'च्या दुसऱ्या हंगामाचा विजेता मॅट मॉस म्हणाला, "सलग दोन वेळा 'आयएसआरएल'चे विजेतेपद मिळवणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येक हंगामागणिक या स्पर्धेचा दर्जा उंचावत आहे. स्पर्धा अधिक चुरशीची होत आहे आणि यातील प्रत्येक यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागत आहे."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ