बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

महामार्गावर 120 च्या वेगावर विनाकारण चलन नाही, गडकरींचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

महामार्गावर 120 च्या वेगावर विनाकारण चलन नाही, गडकरींचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

ताशी 120 किलोमीटर किंवा त्यापेक्षा 20 टक्क्यांपर्यंत जास्त वेगावर विनाकारण ओव्हरस्पीडचा दंड नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी वाहनचालकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने किंवा त्यापेक्षा 20 टक्क्यांपर्यंत जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर विनाकारण ओव्हरस्पीडचा दंड आकारला जाणार नाही, असे या नव्या नियमानुसार ठरले आहे.

वाहनाचा वेग ठरवून दिलेली मर्यादा ओलांडताच मोठे कारण नसताना किंवा क्षुल्लक कारणांवरून ओव्हरस्पीडचे चलन कापले जात असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गडकरी यांनी थेट अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेगमर्यादेच्या कडक नियमांमुळे वाहनचालकांना अनेकदा नाहक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत होते. या वाढत्या तक्रारींवर स्पष्टीकरण देताना गडकरी यांनी सांगितले की, 120 किमी/तास किंवा त्यापेक्षा 20 टक्क्यांपर्यंत जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर मनमानी पद्धतीने चलन फाडले जाणार नाही. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्त्यावर गाडी चालवताना लेन डिसिप्लिन म्हणजेच लेनची शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे असते. विनाकारण लेन बदलल्यामुळे अनेकदा भीषण अपघात होतात. यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने देशातील राष्ट्रीय महामार्गांवर एआय-बेस्ड ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) बसवण्याचे मोठे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात NHAI च्या सुमारे 10 हजार किलोमीटरच्या नेटवर्कवर ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे.

रस्ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात प्रगती करतानाच पर्यावरण रक्षणावरही विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या देशात जैवइंधन (Bio-fuel), फ्लेक्स फ्युएल आणि इथेनॉलच्या (E-20) वापराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनाची मोठी बचत होत आहे आणि प्रदूषणालाही प्रभावीपणे आळा बसत आहे.

याशिवाय रस्ते बांधणीच्या दर्जात गुणात्मक सुधारणा व्हावी आणि महामार्गावरील कंत्राटदारांची मनमानी पूर्णपणे थांबावी, यासाठी NHAI च्या कराराच्या नियमांमध्येही आवश्यक आणि कडक बदल करण्यात आले आहेत.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ