बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:58 IST

गोंडपिपरी नगरपंचायत परिसरात गर्दी, पण एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही; नागरिकांची मागणी

गोंडपिपरीतील नगरपंचायत कार्यालयाचा परिसर शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असूनही तिथे सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने हजारो नागरिकांची गैरसोय होत आहे.

गोंडपिपरी नगरपंचायत परिसरात गर्दी, पण एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही; नागरिकांची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गोंडपिपरी शहरातील नगरपंचायत कार्यालयाचा परिसर सध्या सर्वाधिक गजबजलेला आणि वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र एवढ्या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने या परिसरात तातडीने स्वच्छतागृह उभारावे, ही मागणी आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

या भागात बँका, शाळा आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने मोठी वर्दळ असते. भाग्यश्री बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एफ.डी.सी.एफ. बँक अशी तीन प्रमुख बँकांची कार्यालये इथे आहेत. गजानन कॉलेज आणि जनता हायस्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थाही याच परिसरात आहेत. काळे कॉम्प्लेक्ससह अनेक मोठी दुकाने आणि प्रतिष्ठाने असल्याने ग्राहक, विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची दिवसभर मोठी ये-जा सुरू असते. वर्दळ एवढी असल्याने इथे स्वच्छतागृहाची गरज आहे.

परिसरातील व्यापारी, नागरिक आणि महिला वर्गाकडून अशी मागणी केली जात आहे की, नगरपंचायतीने या समस्येचे गांभीर्य ओळखून प्राधान्याने इथे सुसज्ज आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. नगरपंचायत प्रशासन प्रत्यक्षात कधी पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायत परिसर हे शहराचे मुख्य केंद्र आहे. इथे दररोज शेकडो ग्रामीण नागरिक आणि महिला विविध कामांसाठी येतात. अशा गजबजलेल्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी आणि सोयीशी खेळ न करता तातडीने इथे अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी सुजाण नागरिकांनी दाखवली आहे.

ज्येष्ठ पत्रकार संदीप रायपुरे (गोंडपिपरी) म्हणाले, "स्वच्छ भारत अभियानाच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, मात्र नगरपंचायत प्रशासनाला आपल्या स्वतःच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात मूलभूत सुविधा निर्माण करता आलेली नाही, हे दुर्दैवी आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींची होणारी कुचंबणा पाहता, या समस्येवर वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू. प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे."

नगरपंचायत गोंडपिपरीचे मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी सांगितले, "या परिसरात नागरिकांची वाढती वर्दळ पाहता सार्वजनिक स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. जागेची उपलब्धता तपासून आणि निधीचे नियोजन करून या ठिकाणी लवकरच सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय दूर करण्यास आमचे प्राधान्य राहील."

स्थानिक महिला अरुणा तैलेश वनकर म्हणाल्या, "या परिसरात बँका, शाळा आणि दुकाने असल्यामुळे आम्हा महिलांना विविध कामांसाठी इथे यावे लागते. तासनतास थांबावे लागते, पण एकही स्वच्छतागृह नसल्याने आमची मोठी कुचंबणा होते. प्रशासनाने महिलांच्या या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन इथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे."

स्थानिक व्यापारी अजय माडूरवार यांनी सांगितले, "काळे कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या परिसरात शेकडो दुकाने आहेत. इथे ग्रामीण भागातून हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र स्वच्छतागृहाअभावी ग्राहकांचे, विशेषतः महिलांचे हाल होतात. अनेकदा त्यांना दुकानातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करावी लागते. यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या परिसरात तात्काळ सुविधेची गरज आहे."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ