सोने तारण कर्ज घ्यायचे? पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाची पद्धत जाणून घ्या
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोन्याचे दागिने किंवा नाणी न विकता गहाण ठेवून कर्ज घेता येते. त्यासाठी कोण पात्र ठरते, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा, ते येथे दिले आहे.
सोन्याचे दागिने, अलंकार किंवा नाणी न विकता ती गहाण ठेवून पैसे उभे करता येतात, यालाच गोल्ड लोन म्हणतात. अर्ज करण्याआधी पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि प्रक्रिया कशी चालते, हे माहीत असेल तर सोन्याच्या मूल्यांकनाची तयारी करणे सोपे जाते. तसेच आपल्या गरजेला साजेशी कर्जाची रक्कम ठरवणेही त्यामुळे सोपे होते.
कर्जासाठी पात्रता किती, हे कर्ज देणाऱ्या संस्थेच्या अटींवर आणि गहाण ठेवायच्या सोन्यावर अवलंबून असते. काही मूलभूत निकष असे आहेत. अर्जदार भारतीय नागरिक असला पाहिजे. त्याचे वय 21 ते 80 वर्षे यांच्या दरम्यान हवे. दागिने किंवा अलंकार साधारणपणे 18K ते 22K शुद्धतेचे असावेत. 24K पर्यंतची सोन्याची नाणीही लागू मर्यादांच्या अधीन राहून स्वीकारली जाऊ शकतात. शिवाय तारण म्हणून ठेवता येईल असे पात्र सोने अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे. अर्जदार पगारदार असो, स्वयंरोजगार करणारा असो किंवा निवृत्तिवेतनधारक असो, लागू अटी पूर्ण होत असतील तर त्याला अर्ज करता येतो.
अर्ज आणि पडताळणी सुरळीत पार पडावी म्हणून KYC कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. खालीलपैकी कोणतेही एक अधिकृत कागदपत्र द्यावे लागते: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, NREGA जॉब कार्ड किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरने दिलेले पत्र. बजाज फायनान्सकडून 5 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे गोल्ड लोन घ्यायचे असेल, तर PAN कार्डही द्यावे लागते. पडताळणी पूर्ण करण्यासाठी कर्ज देणारी संस्था आणखी कागदपत्रे किंवा माहिती मागू शकते.
अर्ज करण्यापूर्वी गोल्ड लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर वापरून आपल्या सोन्यावर किती कर्ज मिळू शकेल, याचा अंदाज घेता येतो. हा अंदाज साधारणपणे सोन्याची शुद्धता, निव्वळ वजन, लागू सोन्याचे मूल्यांकन आणि कर्ज देणाऱ्या संस्थेच्या अटी यांवर ठरतो. उदाहरण द्यायचे तर, पात्र सोन्याचे मूल्यांकन 1 लाख रुपये झाले आणि लागू कमाल LTV मर्यादा 85 टक्के असेल, तर सांगता येणारी कर्जाची रक्कम अशी: 1,00,000 रुपये x 85 टक्के = 85,000 रुपये.
हे केवळ उदाहरण आहे, कर्जाची निश्चित ऑफर नाही. संस्थेने सोन्याचे मूल्यांकन करून लागू कर्ज मर्यादा लावल्यानंतर प्रत्यक्ष पात्रता वेगळी निघू शकते. बजाज फायनान्स 5,000 रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत गोल्ड लोन देते, मात्र ते पात्रता, सोन्याचे मूल्यांकन आणि LTV मर्यादा यांच्या अधीन आहे. अर्जापूर्वी कॅल्क्युलेटरने आपल्या कर्जाच्या गरजेचे नियोजन करावे.
अर्ज बजाज फायनान्सच्या वेबसाइटवर किंवा अॅपवर ऑनलाइन सुरू करता येतो. त्याच्या पायऱ्या अशा: प्रथम बजाज फायनान्स गोल्ड लोन पेजवर जाऊन 'APPLY NOW' बटण निवडावे. मग 10 अंकी मोबाइल नंबर टाकून त्यावर आलेल्या OTP ने तो पडताळावा. त्यानंतर अर्जात मागितलेली वैयक्तिक माहिती भरावी. सोन्याच्या मूल्यांकनासाठी जवळची बजाज फायनान्स गोल्ड लोन शाखा निवडावी. तपशील सादर केल्यावर कर्जाच्या पात्रतेचे तत्त्वतः मान्यतेचे पत्र डाउनलोड करता येते.
शाखेत गेल्यावर सोन्याची शुद्धता तसेच एकूण आणि निव्वळ वजन तपासले जाते. या मूल्यांकनाच्या वेळी अर्जदार स्वतः हजर असणे आवश्यक आहे. RBI च्या Gold and Silver Collateral Directions, 2025 नुसार संदर्भ किंमत म्हणून आधीच्या 30 दिवसांची सरासरी बंद किंमत आणि आदल्या दिवसाची बंद किंमत यांपैकी कमी असलेली, तीही त्याच शुद्धतेची किंमत वापरावी लागते. ही किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) किंवा सेबीच्या (SEBI) नियमनाखालील कमॉडिटी एक्स्चेंजने प्रसिद्ध केलेली असली पाहिजे. फक्त सोन्याचे मूळ मूल्य धरले जाते, त्यामुळे खडे, रत्ने आणि इतर सजावट वगळली जाते. मूल्यांकन आणि लागू पडताळणी पूर्ण झाली की कर्ज देणारी संस्था अंतिम ऑफर कळवते. मंजुरी आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर रक्कम दिली जाते.
कर्ज स्वीकारण्यापूर्वी कर्जाचा एकूण खर्च, लागू शुल्क आणि परतफेडीचे वेळापत्रक तपासावे. परतफेडीच्या अटी आपल्या आर्थिक परिस्थितीला परवडणाऱ्या आहेत ना, याची खात्री करावी, कारण गहाण ठेवलेले सोने परत मिळवण्यासाठी वेळेवर परतफेड करणे गरजेचे असते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.