सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:18 IST

खेळ सेना मंडळाच्या गरबा-दांडिया उत्सवात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला २० हजारांची आर्थिक मदत

चंद्रपूरमध्ये खेळ सेना मंडळाच्या नवरात्र उत्सवात कोरपना तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी गजानन पूनम मालेकर यांच्या कुटुंबाला २० हजार रुपयांची मदत देण्यात आली.

खेळ सेना मंडळाच्या गरबा-दांडिया उत्सवात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला २० हजारांची आर्थिक मदत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूरमध्ये खेळ सेना मंडळाच्या वतीने सोमय्या माता अंबे भवानी नवरात्र उत्सव व गरबा-दांडिया चॅलेंज २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. गाणी आणि नाचाचा जल्लोष सुरू असतानाच मंडळाने सामाजिक बांधिलकी दाखवणारा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला. कोरपना तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी गजानन पूनम मालेकर यांच्या कुटुंबाला मंडळाने एकूण २० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श समोर ठेवला.

गरबा-दांडिया उत्सवाचे संचालक आणि खेळ सेना मंडळाचे सचिव राजेश नायडू यांनी अचानक या आर्थिक मदतीची घोषणा केली. मालेकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आर्थिक आधार द्यावा, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रकाश खंके यांनी मालेकर कुटुंबाला कोरपना येथून गरबा-दांडिया उत्सवाच्या ठिकाणी आणले. तिथे खेळ सेना मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा नायडू, जयदीप भाऊरोडे, अरविंद सोनी, मदन गुप्ता आणि प्रकाश खंके यांनी सगळ्यांनी मिळून कुटुंबाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यानंतर जयदीप भाऊरोडे यांनी स्वतःकडून आणखी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे मालेकर कुटुंबाला एकूण २० हजार रुपयांची मदत मिळाली.

यावेळी बोलताना खेळ सेना मंडळाचे सचिव आणि गरबा-दांडिया उत्सवाचे आयोजक राजेश नायडू म्हणाले, "या देशात जोपर्यंत शेतकरी आणि शिक्षकांना सन्मान मिळत नाही, तोपर्यंत देशाची खरी प्रगती होऊ शकत नाही." समाजातील गरजू आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी खेळ सेना मंडळ यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जयदीप भाऊरोडे यांनीही मालेकर कुटुंबाला आवाहन केले की, पुढे कधीही कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज पडली, तर त्यांनी संपर्क साधावा. तसेच कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हमी त्यांनी दिली.

या मदतीबद्दल मालेकर कुटुंबाच्या वतीने कोरपना येथील डॉ. खंके यांनी आयोजकांचे आभार मानले.

सण आणि उत्सव फक्त मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असा संदेश खेळ सेना मंडळाच्या या उपक्रमातून देण्यात आला. गरबा-दांडियाच्या रंगतदार वातावरणात गरजू शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देऊन मंडळाने सामाजिक कामाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ