आयपॅड मिनी (2026) भारतात दाखल, ओएलईडी स्क्रीन आणि A20 Pro चिप; किंमत 82,900 रुपयांपासून
एप्पलने आयपॅड मिनी (2026) भारतासह जागतिक बाजारात आणला आहे. यात 8.5 इंच ओएलईडी डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेट आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एप्पल कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो सिरीज लाँच केली होती. त्यानंतर आता कंपनीने iPad Mini (2026) हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हे मॉडेल भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. यात 8.5 इंच ओएलईडी डिस्प्ले दिला आहे आणि या सिरीजमधील ओएलईडी स्क्रीन असलेले हे पहिलेच मॉडेल आहे. त्यात सर्वात नवीन A20 Pro चिपसेट आहे, तसेच एआय फीचर्सही मिळणार आहेत.
भारतात आयपॅड मिनी (2026) च्या वायफाय मॉडेलची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. वायफाय+ सेल्युलर मॉडेलसाठी 1,00,900 रुपये मोजावे लागतील. कंपनी खरेदीवर एजुकेशन डिस्काऊंटही देत आहे आणि त्यानंतर किंमत 76,900 रुपये होणार आहे. हे डिव्हाईस 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांत मिळते.
नवीन आयपॅड मिनी 'मिडनाईट' आणि 'स्टारलाईट' या दोन रंगांत आला आहे. 28 ऑक्टोबरपासून एप्पल इंडिया वेबसाईट आणि एप्पल स्टोअर ॲपवर प्री-ऑर्डर सुरू होणार आहे. विक्री 6 नोव्हेंबरपासून एप्पल स्टोअर आणि ऑथराइज्ड रिटेलर्सकडे सुरू होणार आहे. टॅब्लेटसोबत कंपनी नवीन स्मार्ट फोलिओ कव्हरही आणत आहे. त्याची किंमत 8,500 रुपये असून ते नेव्ही ब्लू आणि टॉउप रंगांत मिळते. हा टॅब्लेट एप्पल पेन्सिल प्रो आणि एप्पल पेन्सिल यांना सपोर्ट करतो. त्यांच्या किमती अनुक्रमे 11,900 रुपये आणि 7,900 रुपये आहेत.
डिस्प्लेबद्दल सांगायचे तर, यात 8.5 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. त्याचे रेजोल्यूशन 2316x1512 पिक्सेल आहे आणि P3 वाइड कलर गॅमटचा सपोर्ट मिळणार आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,200 निट्सपर्यंत वाढवता येते. प्रखर प्रकाशात स्क्रीनवर पडणारे परावर्तन कमी करण्यासाठी कंपनीने 'नॅनो-टेक्सचर' डिस्प्लेचा पर्यायही दिला आहे.
परफॉर्मंससाठी 2nm प्रोसेसवर बनवलेला A20 Pro चिपसेट वापरला आहे. मागील पिढीच्या तुलनेत हा चिपसेट 4.5 पट अधिक वेगवान एआय (AI) कार्यक्षमता आणि 2.7 पट उत्तम ग्राफिक्स कार्यक्षमता देऊ शकतो, असे एप्पलचे म्हणणे आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, टॅब्लेटमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा सेंटर स्टेज सपोर्टसह येतो. रिअर कॅमेऱ्याने 60fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल.
कनेक्टिविटीसाठी वायफाय 7, ब्लूटूथ 6.0 आणि N1 वायरलेस चिप मिळणार आहे. सेल्युलर मॉडेलमध्ये C2 मॉडेम आणि eSIM सपोर्टही आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP67 रेटिंग मिळणार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हा टॅब्लेट 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देतो. त्यात 35W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.