एप्पल ऑक्टोबरमध्ये पुन्हा लाँच ईव्हेंट घेण्याची शक्यता, नवे आयपॅड मिनी, होमपॉड चर्चेत
सप्टेंबरमधील आयफोन 18 सिरीज लाँचनंतर एप्पल ऑक्टोबरमध्ये आणखी एक ईव्हेंट आयोजित करण्याची चर्चा सुरु झाली आहे.
टेक कंपनी ॲपलने सप्टेंबर महिन्यात एक मोठा लाँच ईव्हेंट घेतला होता, ज्यात आयफोन 18 सिरीज आणि आयफोन डुओ सादर करण्यात आले. मात्र कंपनीचा टेक शो अजून संपलेला नाही, कारण ऑक्टोबर महिन्यात एप्पल आणखी एक ईव्हेंट आयोजित करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
MacRumors या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्त्रोताने असा अंदाज वर्तवला आहे की ऑक्टोबरमध्ये एप्पल एक लाँच ईव्हेंट घेऊ शकते. या ईव्हेंटमध्ये नेमकी कोणती प्रोडक्ट्स लाँच होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. शिवाय, कंपनी ईव्हेंटऐवजी थेट प्रेस रिलीजद्वारेही काही प्रोडक्ट्स बाजारात आणू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
या संभाव्य ईव्हेंटमध्ये सर्वाधिक चर्चा नवीन आयपॅड मिनीची आहे. रिपोर्ट्सनुसार यामध्ये A20 प्रो किंवा A19 प्रो चिपसेट दिला जाऊ शकतो. याशिवाय या डिव्हाईसला ओएलईडी डिस्प्ले, नवीन स्पीकर सिस्टम आणि वॉटर-रेसिस्टेंट डिझाईन मिळेल, अशीही चर्चा आहे.
आयमॅकच्या नव्या मॉडेलमध्ये एम 6 चिपसेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात 24-इंच डिस्प्ले आणि नवे कलर ऑप्शन दिले जाऊ शकतात. तर मॅकबुक प्रोचे 14-इंच मॉडेल एम 6 चिपसह अपडेट होऊ शकते. मॅकबुक प्रोचे ओएलईडी वर्जनही येणार असल्याची चर्चा आहे, ज्यात 14 आणि 16 इंच डिस्प्ले ऑप्शन असतील. मात्र हे ओएलईडी अपडेट या ईव्हेंटमध्ये नाही तर 2026 च्या अखेरीस सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्मार्ट होम सेक्शनमध्येही एप्पल नवे डिव्हाईस आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नव्या होमपॉड मिनीमध्ये नवा चिपसेट, अधिक चांगली साउंड क्वालिटी, N1 चिप आणि Wi-Fi 7 सपोर्ट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यात दुसऱ्या जनरेशनचा अल्ट्रा वाईडबँड चिपही दिला जाऊ शकतो. सोबतच सिरी एआय सपोर्ट आणि नवा रेड कलर ऑप्शनही या डिव्हाईसमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
एप्पल टीव्ही 4केचे नवे वर्जनही या ईव्हेंटमध्ये सादर होऊ शकते. यात ए17 प्रो चिप, 8GB रॅम आणि N1 नेटवर्किंग चिपसह वायफाय 7 सपोर्ट मिळणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच नवा सिरी रिमोटही सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्क्रीनवाले होम हबबद्दलही चर्चा सुरु आहे. एकंदरीत, या संभाव्य ईव्हेंटमध्ये मॅकबुक प्रो, आयपॅड मिनी आणि आयमॅकचे अपडेटेड वर्जनही पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा सध्या सुरु आहे.