मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नानकटाई करून झाल्यावर दगडासारखी कडक होते? मग बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई घरी अशी करा

नानकटाई करून झाल्यावर दगडासारखी कडक होते? मग बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई घरी अशी करा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

दिवाळीच्या फराळातली सगळ्यांची आवडती नानकटाई कडक न होता खुसखुशीत व्हावी, यासाठी बेकरीस्टाईल नानकटाईची सोपी रेसिपी.

दिवाळीच्या फराळातला सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे नानकटाई. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नानकटाई खायला खूप आवडते. पण नानकटाई करताना छोट्या मोठ्या चुका झाल्या, तर पदार्थाची चव खराब होऊन जाते. म्हणूनच नानकटाई करताना योग्य त्या टिप्स फॉलो करणे फार आवश्यक आहे.

दिवाळीच्या फराळात वेगवेगळे पदार्थ केले जातात. पण ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धत वापरून केले नाहीत, तर त्यांना अजिबात टेस्ट लागत नाही. त्यामुळे बेकरीस्टाईल नानकटाईची एक सोपी रेसिपी इथे दिली आहे. या पद्धतीने केलेली नानकटाई अजिबात कडक किंवा दगडासारखी होणार नाही.

सगळ्यात आधी साहित्य जमवून घ्या. यासाठी मैदा, पिठीसाखर, वेलची पावडर, बारीक रवा, बेकिंग पावडर, बदाम-पिस्ते आणि तूप लागेल.

सुरुवातीला एका वाटीत तूप आणि पिठीसाखर एकत्र करा आणि ते चांगले फेटून घ्या. या मिश्रणात गुठळ्या अजिबात राहू देऊ नका.

त्यानंतर एका ताटात मैदा, बारीक रवा, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर घेऊन सगळे एकत्र करा आणि चाळून घ्या. हाताने हे सगळे साहित्य नीट मिक्स केल्यावर त्यात आधी तयार केलेले तुपाचे मिश्रण ओता आणि पुन्हा सगळे एकजीव करा.

आता हे मिश्रण हलक्या हाताने मळून घ्या. चपातीच्या पिठासारखे जोर लावून अजिबात मळू नका. तसे केले तर नानकटाई दगडासारखी कडक होऊन जाते, म्हणून इथे हात हलका ठेवणे महत्त्वाचे आहे.

मळलेले पीठ झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर त्याचे छोटे छोटे चपटे गोळे करून नानकटाई तयार करा आणि प्रत्येकावर पिस्ता आणि बदामाचे काप लावा.

पुढची तयारी ओव्हनमध्ये करायची आहे. ओव्हन १६० अंश सेल्सिअसवर १० मिनिटे प्रीहीट करून घ्या. त्यानंतर त्यात नानकटाई ठेवा आणि १६० अंश सेल्सिअसवरच १५ ते २२ मिनिटे बेक होण्यासाठी ठेवा.

नानकटाईवर हलकासा सोनेरी रंग आला की ती ओव्हनमधून बाहेर काढून घ्या. अशा प्रकारे बेकरीस्टाईलने केलेली खमंग आणि खुसखुशीत नानकटाई तयार होते. यंदाच्या दिवाळीत फराळासाठी ही पद्धत एकदा करून पाहता येईल.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ