मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 18:41 IST

रव्याचे लाडू कडक होतात? बिनपाकाच्या सोप्या पद्धतीने करा मऊसूत लाडू

दिवाळीच्या फराळासाठी कमी वेळात आणि झटपट तयार होणारे बिनपाकाचे रव्याचे लाडू कसे करायचे, त्याची रेसिपी.

रव्याचे लाडू कडक होतात? बिनपाकाच्या सोप्या पद्धतीने करा मऊसूत लाडू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिवाळी सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या सणाआधी घरोघरी साफसफाई केली जाते आणि वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात. चकली, करंजीपासून ते बेसनाचे आणि रव्याचे लाडू असे अनेक पदार्थ या दिवसांत घरात तयार होतात.

या सगळ्या पदार्थांत रव्याचे लाडू अनेकांना सर्वात कठीण वाटतात. कारण रव्याचे लाडू करताना कायमच चुका होतात आणि त्यामुळे लाडूची चव पूर्णपणे बिघडून जाते. कधी लाडू खूप जास्त कडक होतात, तर कधी मिश्रण मऊ पडतं आणि लाडू नीट वळता येत नाहीत.

म्हणूनच बिनपाकाचे रव्याचे लाडू बनवण्याची एक सोपी रेसिपी इथे सांगितली आहे. या पद्धतीने बनवलेले लाडू अजिबात कडक होणार नाहीत आणि चवही मस्त लागेल. शिवाय लाडू खाल्ल्यानंतर घरातले सगळेच तुमचं कौतुक करतील. हे लाडू कमी वेळात आणि झटपट तयार होतात. चला तर आता ही कृती एकेक टप्प्याने पाहू.

साहित्य अगदी मोजकं लागतं. रवा, तूप, पिठीसाखर, वेलची पावडर, पिस्त्याचे काप आणि मनुके एवढंच साहित्य या लाडवांसाठी लागतं.

सर्वात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झालं की गॅस बारीक करून त्यात रवा घाला आणि मंद आचेवर भाजा.

रवा २० ते २५ मिनिटं चमच्याने सतत हलवत राहा. असं केल्याने रवा कढईला चिकटणार नाही आणि तो लालसर भाजला जाईल. रव्याचा रंग हळूहळू बदलत जातो; तो लालसर झाला की गॅस बंद करा. त्यानंतर त्यात पुन्हा एकदा वाटीभर तूप घालून नीट मिक्स करा.

रवा हलकासा कोमट झाला की त्यात आवडीनुसार पिठीसाखर आणि वेलची पावडर घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि एक तासभर मुरण्यासाठी तसंच ठेवून द्या.

त्यानंतर तयार मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या. यामुळे लाडू मऊसूत वळले जातील. मग त्यात पिस्ता आणि मनुके घालून तुम्हाला हवे त्या आकारात लाडू वळून घ्या.

अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवलेले बिनपाकाचे खमंग रव्याचे लाडू तयार होतात. हे लाडू अजिबात कडक होणार नाहीत.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ