गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीत पाणी सुरक्षित ठेवा: उकळून, गाळून आणि प्युरिफायरची निगा राखून प्यायचे आवाहन

दिवाळीत पाणी सुरक्षित ठेवा: उकळून, गाळून आणि प्युरिफायरची निगा राखून प्यायचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

मुंबई महानगरपालिकेने काही भागांतील नागरिकांना ७ दिवस पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स.

अन्न, पाणी आणि वस्त्र या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातली एकही गोष्ट नसेल, तर माणूस नीट जगू शकत नाही. शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहावे म्हणून रोज ३ ते ४ लिटर पाणी प्यावे, असा सल्ला नेहमीच दिला जातो. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारते.

पण आपल्या घरात येणारे पाणी खरोखर स्वच्छ आणि सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाला, तर पाण्यात माती, घाण, गाळ आणि रोगजंतू मिसळण्याची शक्यता असते. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने काही भागांतील नागरिकांना ७ दिवस पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला आहे.

जलाशयाची दुरुस्ती झाल्यावर पुन्हा पाणी सोडले जाते, तेव्हा त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि त्यात मुख्यत्वे कचरा असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून प्यायला सांगितले आहे. अस्वच्छ किंवा दूषित पाणी प्यायल्यास जुलाब, उलट्या आणि टायफॉइडसारख्या आजारांचा धोका झपाट्याने वाढतो. म्हणून पाणी नेहमी गरम करूनच प्यावे.

पाणी दूषित असेल किंवा त्यात गाळ तसाच राहिला असेल, तर ते गरम करून प्यावे. त्यामुळे पाण्यातले जिवाणू, विषाणू आणि परजीवी नष्ट होण्यास मदत होते. गरजेनुसार पाणी टोपात घ्या आणि त्याला उकळी येईपर्यंत तापवा. मग ते थंड होण्यासाठी ठेवा. थंड झालेले पाणी गाळून स्वच्छ भांड्यात घ्या आणि झाकण लावून ठेवा. तरीही पाणी उकळल्यावर जिवाणू किंवा हानिकारक घटक नष्ट होतातच, असे नाही. म्हणून फक्त गरम पाण्यावर अवलंबून न राहता योग्य ती उपाययोजना करावी.

पाण्यात गाळ किंवा माती दिसत असेल, तर आधी थेट गरम करण्याऐवजी ते गाळून घ्या. मग उकळून पुन्हा एकदा कॉटनच्या पातळ कपड्यातून गाळा. साध्या कापडातून गाळल्याने सगळे रोगजंतू नष्ट होत नाहीत. म्हणून आधी पाणी उकळावे आणि नंतरच गाळावे.

घरात आरओ, यूव्ही किंवा दुसऱ्या प्रकारचा वॉटर प्युरिफायर असेल, तर त्याचीही निगा राखणे आवश्यक आहे. ३ ते ४ महिन्यांतून एकदा घरातील पाणी शुद्ध करणाऱ्या उपकरणांची नीट स्वच्छता करून घ्यावी. प्युरिफायर किंवा घरातल्या इतर उपकरणांवर अवलंबून न राहता स्वतः योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ