भारत-न्यूझीलंड T20 मालिका आजपासून; TikTok वर पहिले 6 ओव्हर, भारतात सामना कुठे पाहायचा?
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड पहिल्यांदाच सामना TikTok वर लाईव्ह दाखवणार आहे, पण भारतात TikTok बंद असल्याने चाहत्यांनी Sony LIV किंवा Sony Sports चॅनेलकडे वळावं लागेल.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली T20 मालिका आजपासून सुरू होत आहे. या वेळी मात्र क्रिकेटच्या दुनियेत एक वेगळा प्रयोग होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा सामना पहिल्यांदाच TikTok वर लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय.
इथे भारतीय चाहत्यांपुढे मोठी अडचण उभी राहते, कारण भारतात TikTok बंद आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सरकारने काही वर्षांपूर्वीच भारतात TikTok बंद केलं आहे. त्यामुळे इथले लोक थेट TikTok वर जाऊन सामना पाहू शकत नाहीत. काही जण VPN वापरून पाहण्याचा प्रयत्न करतील, पण तो मार्ग सुरक्षित नाही आणि त्यात अडचणी येऊ शकतात. मग सामना पाहायचा कसा, असा प्रश्न पडतो. पण काळजी करू नका, त्यावर सोपा उपाय आहे.
प्रयोग नेमका काय आहे? न्यूझीलंड बोर्ड आणि Sky Sports यांनी मिळून असं ठरवलं आहे की भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्यातले पहिले 6 ओव्हर, म्हणजे पॉवरप्ले, TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवायचे. आपण मोबाईलवर रील बघतो ना, तसाच सामना उभ्या स्क्रीनवर दिसेल. तरुण पिढीला सतत रील्स बघण्याची सवय आहे, त्यांना क्रिकेटकडे खेचण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.
जगभर याची चर्चा सुरू आहे, पण TikTok वर फक्त पहिले 6 ओव्हरच दिसणार आहेत. पूर्ण सामना तिथे दिसणार नाही. त्यामुळे फक्त सहा ओव्हरसाठी एवढा खटाटोप करण्यापेक्षा पूर्ण सामना बघायला एक सोपा आणि अधिकृत मार्ग उपलब्ध आहे.
भारतासाठी न्यूझीलंड क्रिकेटचे सगळे हक्क Sony Pictures कडे आहेत. 2024 ते 2031 पर्यंतचे TV आणि ऑनलाईन हक्क त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे भारतातल्या चाहत्यांना कोणतंही टेन्शन न घेता सामना इथे पाहता येईल.
पाहण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन बघण्याचा आहे. त्यासाठी Sony LIV App डाउनलोड करा. त्याच्या वेबसाईटवर लॉगिन करूनही सामना बघता येईल. दुसरा पर्याय टीव्हीचा आहे. मोठ्या स्क्रीनवर बघायचा असेल तर Sony Sports Ten 1, Ten 3 आणि Ten 5 या चॅनेलवर सामना थेट दाखवला जाईल.
श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीखाली भारतीय टीम हा सामना खेळत आहे. मालिकेतले सगळे T20 सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होतील. त्यामुळे TikTok च्या भानगडीत न पडता Sony LIV हाच सगळ्यात सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. कोणताही अडथळा न येता पूर्ण मॅच क्लिअर बघता येईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.