सोनिया गांधींचे इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये फक्त तीन अकाऊंट्स
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर इंस्टाग्रामच्या जगात पाऊल ठेवले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी आपले अधिकृत अकाऊंट सुरू केले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासून त्या दूरच होत्या. मात्र आता त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंट सुरू करून सगळ्यांनाच चकित केले आहे.
आपल्या आगामी आत्मचरित्राची एक झलक लोकांसमोर ठेवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. या पुस्तकाचे नाव "बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह" (Belonging: A Journey of Love) असे आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरच्या पहिल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांच्या या अधिकृत अकाऊंटची आता सगळीकडे चर्चा सुरू आहे. अकाऊंट सुरू होताच त्यांच्या फॉलोवर्सची संख्या हजारोंनी वाढली. मात्र त्यांच्या अकाऊंटच्या फॉलोइंग लिस्टकडे पाहिले तर तिथे फक्त तीन अकाऊंट्स दिसतात. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेस पार्टीचे ऑफिशियल पेज एवढ्यांचाच त्यात समावेश आहे.
अकाऊंटवर शेअर केलेल्या पहिल्या रिलमध्येही त्यांनी राहुल, प्रियंका आणि आपल्या पुस्तकाचे प्रकाशक हार्परकॉलिन्स इंडिया यांना टॅग केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही आधीपासूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ॲक्टिव्ह असतात. इंस्टाग्रामवर ते दोघे एकमेकांना फॉलो करतात.
गांधी कुटुंबातील सदस्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा विचार केला तर इंस्टाग्रामवर सर्वाधिक दबदबा राहुल गांधी यांचा दिसतो. भारत जोडो यात्रेनंतर त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढली. आज त्यांचे इंस्टाग्रामवर 16 मिलीअनहून अधिक फॉलोवर्स आहेत. राहुल गांधी यांना कुटुंबातील सर्वात प्रसिद्ध चेहरा मानले जाते.
प्रियंका गांधी यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सुमारे 3 मिलीयन आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर जबरदस्त एंगेजमेंट दिसते. वरुण गांधी आणि मेनका गांधी यांचेही इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. तसेच रॉबर्ट वाड्रा, रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनीही इंस्टाग्रामवर स्वतःचा वेगळा फॅनबेस तयार केला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.