सतेज पाटील यांचा दावा: महायुतीचे 12 संचालक उदयपूरच्या हॉटेलमध्ये, रूम नंबरही माहीत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महायुतीचे 12 संचालक अलिबागला नसून उदयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये आहेत, असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.
गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने 5 संचालक नेमल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला, असे सांगितले जाते. महायुतीतील अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचेही सांगण्यात आले आहे. आता गोकुळचा विषय कोर्टापर्यंत पोहोचला आहे.
पण कोर्टात विषय जाण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झाला. या 5 स्वीकृत सदस्यांना सहकारी संस्थांवर मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. गोकुळच्या मुद्द्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
निवडणुकीचा निकाल पाहिला तर गोकुळच्या एकूण 25 जागांपैकी 12 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागा जिंकल्या. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेला 14 चा कोरम पूर्ण करता न आल्याने निवड होऊ शकली नाही. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीने आणि समविचारी पॅनेलने आपापल्या 12 संचालकांना सहलीला पाठवले.
महायुतीचे हे 12 संचालक अलिबागमध्ये असल्याचे सांगितले जाते. सतेज पाटील स्वतः कोल्हापूरमध्येच आहेत, पण इतर घडामोडींवर आपले बारीक लक्ष आहे, असे ते सांगतात. महायुतीच्या सर्व हालचालींवर आपली नजर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संचालक कुठे आहेत आणि कुठे नाहीत, याची सगळी माहिती आपल्याकडे असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
सतेज पाटील यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, महायुतीचे 12 संचालक गोवा आणि सूरत असा प्रवास करून उदयपूरला पोहोचले आहेत. हे संचालक अलिबागला गेल्याची माहिती सांगितली जात होती, पण प्रत्यक्षात ते उदयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये आहेत, असा दावा त्यांनी केला.
सतेज पाटील यांनी पुढे म्हटले की, मला सगळ्या रूमचे नंबरही माहीत आहेत. सगळेजण पहिल्या मजल्यावर असून त्यांचे रूम नंबर 130 पासून सुरू होतात. सगळ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर सह्याही घेतल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले. महायुतीचे संचालक अलिबागला असल्याची चर्चा होती, मात्र हे सर्वजण नेमके कुठे आहेत, ते आपण सांगितले, असे सतेज पाटील यांचे म्हणणे आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.