सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 09:22 IST

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाखाली नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, संजय राऊत यांचा अमित शाहांवर आरोप

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर बिश्नोईच्या नावाखाली गुन्हे करून घेतल्याचा आरोप केला आहे. हे भाकीत नसून सत्य सांगतोय, असे ते म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आरोप केला आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राऊत म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती तुरुंगात आहे. देशातील अनेक राज्यांच्या पोलिसांना तो हवा आहे. तरीही त्याचा ताबा इतर राज्यांना का दिला जात नाही, असा त्यांचा सवाल आहे. अमित शाह बिश्नोईच्या नावाखाली त्यांना हवे ते गुन्हे करून घेत आहेत, म्हणूनच त्याला साबरमतीत ठेवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, असंही ते म्हणाले. हे आपलं भाकीत नाही, आपण सत्य सांगतोय, असा त्यांचा दावा आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब आणि चंदीगड पोलिसांना तो अनेक खून प्रकरणांत हवा आहे, असं राऊत यांनी सांगितलं. एखादा आरोपी हवा असेल तर पोलीस ट्रान्झिट कस्टडीसाठी प्रयत्न करतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली, त्या प्रकरणात पंजाब पोलिसांना बिश्नोई हवा आहे. बाबा सिद्दीकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याची मागणी केली. सलमान प्रकरणातही मागणी झाली आणि आता टायगर श्रॉफ प्रकरणात मागणी होईल, असं ते म्हणाले.

परदेशातून गुन्हेगार आणले जातात, म्यानमारमधूनही आपण गुन्हेगार आणले आहेत, मग साबरमती तुरुंगातील गुन्हेगार पोलिसांना का दिला जात नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. याचा अर्थ बिश्नोई हे फक्त नाव आहे, खरा चेहरा अमित शाहांचा आहे, असं ते म्हणाले. माफियांच्या टोळ्या भाजपच्या छत्राखाली आणण्याचं काम शाहांनी केलं आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रतिष्ठा दिली, असाही त्यांनी आरोप केला.

आज बॉलिवूडवर दहशत निर्माण केली जात आहे, असं सांगून राऊत म्हणाले की, अमित शाह आणि गुजरातच्या लोकांचा बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न सुरू आहे. राजकारण जसजसं वेगाने पुढे जाईल आणि रिजीम चेंजचा मुद्दा वाढेल, तेव्हा याच बिश्नोईच्या नावाखाली विरोधकांच्या हत्या होतील, विरोधकांवर हल्ले होऊ शकतात, असं ते म्हणाले. भाजपचा लॉरेन्स बिश्नोई कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यांना फ्रस्टेशन आलं आहे आणि ते फ्रस्टेशनमध्ये गेले आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं.

ठाकरे गटात रिजिम चेंज झालं आणि ते ठाकरेंना कळलंही नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातील रिजिम चेंज दिल्लीतील लॉरेन्स बिश्नोईने केलं, त्याचा उल्लेख आपण काल केला होता. हे सर्व लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार आहेत. काल जे शिवसेनेचे बोर्ड लावून भाषण करत होते ते सर्व छोटे लॉरेन्स बिश्नोई आहेत, तर मोठे लॉरेन्स बिश्नोई गुजरातचे दिल्लीत आहेत, असं त्यांनी सांगितलं. बिश्नोईच्या धमक्या, ताकद आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जोरावर झालेलं हे सत्तांतर होतं, मतांच्या जोरावर झालेलं नव्हतं, असं राऊत म्हणाले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ