मुंबईत ATS ची मोठी कारवाई: जैश-ए-मोहम्मदशी संबंधाच्या आरोपावरून माहिममधून एकाला अटक
दहशतवादविरोधी पथकाने माहिम मेट्रो स्टेशनजवळच्या लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून 33 वर्षांच्या मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये मसूद अजहरच्या भाषणांचे ऑडिओ सापडल्याची माहिती आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने (ATS) माहिम परिसरात मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून 33 वर्षांच्या मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला पथकाने अटक केली आहे. ATS च्या काळाचौकी युनिटने माहिम मेट्रो स्टेशनजवळच्या लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपीच्या मोबाईलमध्ये प्रक्षोभक पोस्ट आणि जिहादचे समर्थन करणारे संदेश आढळल्याचा ATS चा दावा आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या भाषणांचे काही ऑडिओही त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्याची माहिती आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याच्या ऑडिओ क्लिपही त्याच्या फोनमध्ये मिळाल्या आहेत.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित एका बातमीवर त्याने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इत्र विकतो आणि बाईक रायडरही आहे, अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून त्याने मुस्लिमांना शस्त्र उचलण्यास प्रवृत्त केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो एक टेलिग्राम ग्रुप चालवत होता आणि त्या ग्रुपवर मसूद अजहरच्या भाषणांचे ऑडिओ अपलोड करत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी त्याचा संपर्क होता का आणि त्याच्या ऑनलाइन हालचाली काय होत्या, याचा ATS सध्या तपास करत आहे. या तपासातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मोहम्मद हसनकडे पुढील चौकशीत केल्यावर तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या आरोपीविरोधात BNS कलम 196(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या इतर संशयित संपर्कांचीही चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे माहिम परिसरात आणि संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.