सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 310 | Very Poor 19:39 IST

CSMT वर खोळंबा, दादरला तुफान गर्दी, भांडूपमध्ये एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मध्य रेल्वे विस्कळीत

सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली असून संध्याकाळीही दादर आणि CSMT स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

CSMT वर खोळंबा, दादरला तुफान गर्दी, भांडूपमध्ये एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मध्य रेल्वे विस्कळीत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नव्या आठवड्याचा पहिला दिवस, म्हणजे सोमवार, मुंबईकरांसाठी काही खास ठरला नाही, उलट तो त्रासाचाच गेला. मुंबईची लाइफलाइन असलेली आणि लाखो लोकांना रोज त्यांच्या ठिकाणी पोहोचवणारी रेल्वेसेवा सकाळपासूनच विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आणि त्याचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती 5 तासांनंतर झाली. तरीही वाहतूक अजून पूर्वपदावर आलेली नाही. सकाळी 10 पासून मध्य रेल्वेच्या कारभारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दुसरीकडे भांडूप रेल्वे स्टेशनवर एसी लोकलची धडक बसून एका कॉलेजमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची धडक बसली आणि त्यात त्या तरुणाने जीव गमावला.

सकाळपासून विस्कळीत झालेल्या सेवेचा परिणाम संध्याकाळीही दिसत आहे. दादर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. ऑफिसेस सुटल्यामुळे नोकरदार वर्ग पुन्हा घरी निघाला आहे, पण स्टेशनवर त्यांना खोळंबून राहावे लागत आहे आणि गर्दी वाढतच चालली आहे. मध्य रेल्वेची सेवा अजूनही पूर्ववत झालेली नाही, हे त्याचे कारण आहे.

CSMT स्टेशनवरही प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. संपूर्ण स्टेशनवर प्रचंड गर्दी असून पाय ठेवायलाही जागा नाही.

दादर स्टेशनचे सगळे प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून गेले आहेत. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यानंतर त्याचा परिणाम अजूनही दादर स्टेशनवर दिसत आहे. लोक रेल्वेची वाट पाहत ताटकळत उभे आहेत. अनेक जण बऱ्याच वेळापासून उभे असून त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या विस्कळीतपणामुळे प्रवासी वैतागले असून अनेकांनी नाराजी बोलून दाखवली.

रविवारी मेगाब्लॉक होता, तरीही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेची अशी अवस्था झाली, असे प्रवासी म्हणाले. मेगाब्लॉकमध्ये ट्रेन बंद ठेवून तुम्ही काय करता, असा सवाल एका प्रवाशाने विचारला. सोमवार नुकताच उजाडलाय आणि तुमची ट्रेन एकही दिवस नीट चालत नाही, दररोज काही ना काही अडचणी येतच राहतात, असेही प्रवाशांनी सांगितले. फक्त टेक्निकल फॉल्ट म्हणून जाहीर केले की विषय संपतो, मग संडेच्या दिवशी तो फॉल्ट का सुधारत नाहीत, असे विचारत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

परिस्थितीबाबतची ताजी माहिती मिळताच ती देण्यात येईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ