सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 160 | Moderate 15:19 IST

कांजूरमार्गला सिग्नल केबिनला आग, मध्य रेल्वे पाच तासांपासून ठप्प; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र

कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनमध्ये आग लागल्याने ठाणे ते विक्रोळी दरम्यानची सिग्नल यंत्रणा बंद पडली असून मध्य रेल्वेची वाहतूक पाच तासांपासून विस्कळीत आहे.

कांजूरमार्गला सिग्नल केबिनला आग, मध्य रेल्वे पाच तासांपासून ठप्प; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला. दुपारचे दोन वाजले तरी मध्य रेल्वे प्रशासनाला हा बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. रोज उशिराने येणाऱ्या गाड्या आणि वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यामुळे आधीच मध्य रेल्वेच्या कारभाराबद्दल नाराजी आहे, त्यात आजच्या प्रकाराने कळस गाठला, असे चित्र आहे.

त्यामुळे गेल्या पाच तासांपासून मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची, धीम्या तसेच जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रुळांवर गाड्या एकापाठोपाठ एक उभ्या आहेत आणि त्यात लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही आहेत. हा खोळंबा सकाळपासूनच सुरू आहे.

या खोळंब्याची सुरुवात सकाळी 10 वाजता मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडाने झाली, तेव्हा वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनमध्ये आग लागली. त्यामुळे ठाणे ते विक्रोळी दरम्यानची संपूर्ण सिग्नल यंत्रणा बंद पडली.

आग लागताच कांजूरमार्ग स्टेशनच्या पुढचे सगळे सिग्नल एका झटक्यात बंद झाले. मोटरमनना लोकल जागेवरच थांबवाव्या लागल्या. एक-दोन तास उलटूनही गाड्या एकाच जागी उभ्या होत्या, म्हणून अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत पुढचे स्टेशन गाठले.

तेथील केबल बदलण्यासाठी अजून सुमारे तीन ते चार तास लागणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होईपर्यंत रात्र होण्याची शक्यता आहे.

पुढच्या काही तासांत सिग्नल यंत्रणा सुरू झाली तरी लोकलचे आतापर्यंतचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या स्टेशनांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे कालच मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एवढा मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने मेगाब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेने नेमके काय केले, असा सवाल विचारला जात आहे. प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ