सदावर्ते सुपारी बहाद्दर आणि मेंटल, मराठा आंदोलक महेश डोंगरे यांचा थेट इशारा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कितीही पोलीस संरक्षण दिले तरी चोप देणार म्हणजे देणारच, असा इशारा मराठा आंदोलक महेश डोंगरे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना दिला आहे.
गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून सतत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे जेव्हा मुंबईत आले होते, तेव्हाही सदावर्ते यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तर सदावर्ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत होते. याच दरम्यान "पूर्णेकर कुटुंबियांची इच्छा आहे की, मी त्यांची केस लढावी", असाही उल्लेख करण्यात आला आहे.
सदावर्ते सतत जरांगे यांच्यावर टीका करत असतानाच मराठा आंदोलक महेश डोंगरे यांनी त्यांना इशारा दिला आहे. येणाऱ्या काळात सदावर्ते यांना कितीही पोलीस संरक्षण दिले तरी चोप देणार म्हणजे देणारच, असा थेट इशारा डोंगरे यांनी दिला. सदावर्ते मेंटल झाले असून त्यांच्यासाठी मिरजच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्ही बेड बुक केला आहे, असेही डोंगरे यांनी म्हटले.
डोंगरे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यासाठी सदावर्ते यांनी कोणाची सुपारी घेतली, हे आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. सदावर्ते सुपारी बहाद्दर आणि मेंटल आहेत, घरात गाढव पाळणारे आहेत, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या काळात तुला जेलमध्ये टाकल्यावर तुझी घरची जर्शी गाय "शिंदे साहेबांना वाचवा" म्हणत वर्षा बंगल्याच्या बाहेर किती फिरत होती, असेही डोंगरे यांनी सदावर्ते यांना उद्देशून म्हटले. अशा शब्दांत त्यांनी सदावर्ते यांच्यावर थेट टीका केली.
एस टी महामंडळातील लोक तुला चपलेने मारत होते, तेव्हा तू शिंदे यांचे पाय धरले होते, असा दावा डोंगरे यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत भ्रष्टाचार केला आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बँक निवडून आल्यावर तुझे पित्त उसळले, असेही ते म्हणाले. सदावर्ते, औकातीत राहा, येणाऱ्या काळात तुला नक्कीच चोप देणार आहे, असे डोंगरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
शेवटी डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली. मुख्यमंत्री साहेब, सदावर्ते यांना आवर घाला, असे ते म्हणाले. सदावर्ते सरकारमधील मंत्र्यांवर बोलतात आणि जातीजातीत तेढ निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला. सदावर्ते डुकराची अवलाद असून डुकराप्रमाणे कुठेही जाऊन तोंड घालतात, अशीही टीका डोंगरे यांनी केली. येणाऱ्या काळात तू कितीही पोलीस संरक्षण घेऊन फिर, तुला मारणार म्हणजे मारणार, असे डोंगरे यांनी पुन्हा एकदा सदावर्ते यांना उद्देशून सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.