शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पर्यावरणावर बोलणं ही फॅशन झालीय, काही नेत्यांना आणि अभिनेत्यांना शिकवणीची गरज: अमित साटम

पर्यावरणावर बोलणं ही फॅशन झालीय, काही नेत्यांना आणि अभिनेत्यांना शिकवणीची गरज: अमित साटम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी कर्जतच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या टीकेदरम्यान पर्यावरणावर बोलणाऱ्यांवर निशाणा साधला.

पर्यावरणाबद्दल बोलणं हल्ली फॅशन होऊन बसलं आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली. ग्लोबल वॉर्मिंगवर बोलणंही फॅशनच झालं आहे, असं ते म्हणाले. कर्जत येथील वृक्षतोडीवरून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. भीमाशंकरच्या जंगलात एका पंप हाऊस प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात आली. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर साटम बोलत होते.

शाश्वत विकास म्हणजे काय, हे सांगताना साटम म्हणाले की, विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. पुढच्या काळात जन्म घेणाऱ्या पिढ्यांना या विकासाचा कुठलाही फटका बसता कामा नये, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, म्हणजे शाश्वत विकास. पण या शब्दाचा खरा अर्थ, त्याचं डेफिनेशन अनेक लोक समजून घेत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.

अनेक लोक पर्यावरणाच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात, असं साटम यांनी सांगितलं. पर्यावरणाचा मुद्दा आला की आम्हीच एकमेव पर्यावरणाचे कैवारी आहोत, अशा आविर्भावात ते मिरवतात, असा टोला त्यांनी लगावला. क्लीन एनर्जीचे, क्लायमेट चेंजचे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे कॅलक्युलेशन्स काय असतात, याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी घेणं आवश्यक आहे, असं आम्हाला वाटतं, असं ते म्हणाले.

पंप स्टोरेज प्लांट म्हणजे वीज निर्मिती प्रकल्प, असं साटम यांनी स्पष्ट केलं. जगभरात पंप स्टोरेजची क्षमता वाढत आहे. चीन, अमेरिका आणि जपान या देशांत पंप स्टोरेज प्रकल्पांनी वेगाने गती घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

क्लीन एनर्जी म्हणजे सोलार एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो पावर एनर्जी आणि पंप स्टोरेजची एनर्जी, असं साटम यांनी सांगितलं. भारत 2070 मध्ये नेट एमिशन झीरो होईल, असं ते म्हणाले. महाराष्ट्राचे आधीचे एक पर्यावरण मंत्री म्हणाले होते की महाराष्ट्र 2050 मध्ये नेट एमिशन झीरो होणार. त्यांना नेट एमिशन झीरोचा अर्थच कळत नाही, कळला असता तर अशा गप्पा मारल्या नसत्या, अशी टीका साटम यांनी केली.

2070 मध्ये नेट एमिशन झीरो व्हायचं असेल तर सोलार एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, विंड एनर्जी आणि पंप स्टोरेज एनर्जी वाढवावी लागेल, असं साटम यांनी म्हटलं. कोळशापासून वीज निर्मिती केल्याने मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस एमिशन्स होतात. ते कमी करण्यासाठी झाडं लावावी लागतात. किती झाडं लावल्यावर कार्बन एमिशन्स नेट झीरो होऊ शकतात, याचं एक कॅलक्युलेशन आहे. त्याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

कर्जतच्या साई डोंगरावर पंप स्टोरेजचा 3000 मेगावॅटचा प्लांट आहे, असं साटम यांनी सांगितलं. त्या प्लांटचे काय फायदे आहेत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे, त्याच्या डिटेलमध्ये मला जायचं नाही, असं ते म्हणाले. प्रेस नोट इश्यू झाली नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

सोलार एनर्जी दिवसा मिळते, रात्रीच्या वेळी मिळत नाही, असं साटम यांनी सांगितलं. संध्याकाळी पावर हवी असेल तर कोळशापासून 3000 थर्मल पावर मेगावॅटच्या पावर प्लांटमधून जेवढे कार्बन एमिशन्स होतील, ते कमी करण्यासाठी 28 कोटी झाडं लावावी लागतील, असं त्यांनी म्हटलं. त्यासाठी मुंबईच्या 15 पट जागा लागेल, असंही साटम म्हणाले.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ