गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अर्णव चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात अलर्ट, दोन दिवस राज्यात धो धो पाऊस

अर्णव चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात अलर्ट, दोन दिवस राज्यात धो धो पाऊस छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

अर्णव चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

अर्णव चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला. या वादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण आणि उत्तर भारताला बसला आहे. या भागातील काही राज्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. आता या वादळानंतर महाराष्ट्रातही अलर्ट देण्यात आला आहे.

आज आणि उद्या, म्हणजे 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह धो धो पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या वातावरणात बदल होणार आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होईल. हवामान विभागाने सोसाट्याच्या वाऱ्याचाही अंदाज दिला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं सांगितलं जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, तोही मेघगर्जनेसह. या काळात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत हवामानात बदल दिसू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

दरम्यान, अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात अर्णव वादळ तयार झाल्यामुळे अमरावतीत पावसाने हजेरी लावली. पुढचे दोन ते तीन दिवस अमरावतीत असाच पाऊस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अर्णव चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशालाही अलर्ट देण्यात आला आहे. तिथे 28 ते 31 पर्यंत, म्हणजे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चार दिवसांत उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सरकारकडून अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ