मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:50 IST

इराण, क्युबाच्या मुद्द्यावर चीनचे अमेरिकेला संयुक्त राष्ट्रांत सडेतोड प्रत्युत्तर

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनात ट्रम्प यांच्या इराण आणि क्युबावरील वक्तव्यांना चीनने राजनैतिक भाषेत पण ठाम शब्दांत उत्तर दिले.

इराण, क्युबाच्या मुद्द्यावर चीनचे अमेरिकेला संयुक्त राष्ट्रांत सडेतोड प्रत्युत्तर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

संयुक्त राष्ट्रांच्या यंदाच्या ८१व्या महासभा अधिवेशनाला जगभरात विशेष महत्त्व दिले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मूळ तत्त्वानुसार या व्यासपीठावर सगळे देश समान मानले जातात, इथे कोणी गरीब-श्रीमंत किंवा मोठा-लहान असा भेद नसतो. मात्र अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आणि जगभरात कंझर्वेटिव्ह विचारसरणीचा प्रभाव वाढल्यानंतर अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त राष्ट्रांचे महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली, असे या अधिवेशनात दिसून आले.

याचबरोबर या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला (क्रिमिनल कोर्ट) मानण्यास नकार दिल्याची भूमिका घेतली आहे. नेतन्याहू यांच्या विरोधात अनेक देशांचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडू लागले, तेव्हा व्यासपीठाची मर्यादा न राखता नेतन्याहू यांनी बाहेर जाणाऱ्या लोकांना घाबरट, भित्रे असे संबोधले. इस्रायलवरील सर्व आरोप त्यांनी ठामपणे फेटाळून लावले, इतकेच नव्हे तर सीरियाच्या पंतप्रधानांसमोर त्यांनी ग्रेटर इस्रायलची आपली भूमिका मांडली.

दुसरीकडे ट्रम्प यांनी याच व्यासपीठावरून इराणला इशारा दिला. इराण आमच्यासमोर कसा झुकत नाही तेच बघतो, अशा आविर्भावात ट्रम्प यांनी इराणवर आपले मत मांडले. याला उत्तर म्हणून चीननेही जश्यास तसे प्रत्युत्तर देत समतोल राखल्याचे दिसून आले.

इराणच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इराणविरोधातील अमेरिकी लष्करी कारवाईचे समर्थन केले आणि करार झाला नाही तर इराणविरोधात आणखी कठोर कारवाईची शक्यता वर्तवली. यावर चीनने लष्करी कारवाईऐवजी संवाद आणि राजनैतिक मार्गाने इराणचा प्रश्न सोडवला जावा, अशी भूमिका मांडली. अमेरिकेच्या एकतर्फी निर्बंधांना आणि लष्करी दबावाला चीनने याआधीही तेवढ्याच ताकदीने विरोध केला होता. अमेरिका म्हणेल तसेच सगळे कसे होणार, यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवला.

क्युबाच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी आपल्या भाषणात क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारवर टीका केली आणि क्युबातील परिस्थितीत मूलभूत बदल घडवण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या याच वक्तव्यादरम्यान क्युबाच्या प्रतिनिधी मंडळाने सभागृहाबाहेर पडल्याचेही वृत्त आहे.

या संपूर्ण भाषणातून चीनने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील एकतर्फी दबाव आणि हस्तक्षेपाच्या भूमिकेला स्पष्ट विरोध दर्शवला. इराण असो वा क्युबा, संबंधित देशांचे सार्वभौमत्व आणि त्यांचा स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्ण जगाने आदराने पाहावा, असा खणखणीत पलटवार चीनने ट्रम्प यांच्यावर केला.

जिनपिंग सध्या अमेरिका भेटीवर आहेत म्हणून चीनने या भूमिकेत कुठेही मवाळपणा दाखवला नाही किंवा कसलाही दुजाभाव ठेवला नाही. आपल्या मित्र देश इराण आणि क्युबासाठी चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला स्पष्ट शब्दांत इशारा दिला असल्याचे बोलले जाते. यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील परराष्ट्र धोरणातील मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ