मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:23 IST

'रामायण'नंतर आदिनाथ कोठारे आणखी एका बॉलिवूड चित्रपटात, यामी गौतमसोबत 'नई नवेली'

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे अभिनेत्री यामी गौतमसोबत 'नई नवेली' या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

'रामायण'नंतर आदिनाथ कोठारे आणखी एका बॉलिवूड चित्रपटात, यामी गौतमसोबत 'नई नवेली'
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्या दमदार अभिनयाने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण करत आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. तो आता आणखी एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नई नवेली' असे या चित्रपटाचे नाव असून त्यात तो अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'नई नवेली'मध्ये आदिनाथ कोठारे आणि यामी गौतम यांची नवी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून आदिनाथचा रुबाबदार आणि वेगळा अंदाज लक्ष वेधून घेतो. हॉरर, कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा यांचा मिलाफ असलेल्या या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

चित्रपटाची कथा अवस्थी कुटुंबाभोवती फिरताना दिसते. त्यामुळे हॉररबरोबरच विनोद आणि कौटुंबिक नात्यांचा मनोरंजक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

आदिनाथ सध्या 'रामायण' या बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपटामुळेही चर्चेत आहे. 'रामायण'नंतर आता 'नई नवेली'च्या माध्यमातून त्याची आणखी एक वेगळी भूमिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. दोन वेगळ्या भूमिका आणि दोन वेगळे विषय यांतून त्याच्या अभिनयाचे अनेक पैलू पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या कथा आणि भूमिका निवडण्याकडे आदिनाथचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे 'नई नवेली'मधील त्याचा अंदाजही प्रेक्षकांसाठी खास ठरेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'नई नवेली'ची निर्मिती चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बालाजी मोहन यांनी सांभाळली आहे. तर हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक मनोरंजन यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दिवाळीच्या मुहूर्तावर मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. 'नई नवेली' हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे यांची नवी जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

बॉलिवूडमध्ये आदिनाथ कोठारे याचा प्रवास सातत्याने पुढे जात आहे. 'नई नवेली'बरोबरच तो 'रामायण'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्यासाठी येणारा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ