Vivo चे X500, X500 प्रो, X500 प्रो मॅक्स चीनमध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Vivo कंपनीने चीनमध्ये X500 सीरीजचे तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले असून यात 200MP कॅमेरा आणि 8,000mAh बॅटरीसारखे दमदार फीचर्स आहेत.
टेक कंपनी Vivo ने चीनमध्ये आपली नवी X500 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Vivo X500, Vivo X500 Pro आणि Vivo X500 Pro Max असे तीन मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. प्रिमियम रेंजमधील हे स्मार्टफोन्स दमदार कॅमेरा आणि पावरफुल परफॉर्मंससाठी ओळखले जात आहेत.
किंमतीबाबत बोलायचं झालं तर Vivo X500 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 79,000 रुपये इतकी आहे. याच फोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटसाठी CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये मोजावे लागतील, तर 12GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे.
Vivo X500 Pro च्या 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी CNY 6,499 म्हणजेच सुमारे 93,000 रुपये मोजावे लागतील. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये असून 12GB + 1TB व्हेरिअंटसाठी CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,22,000 रुपये मोजावे लागणार आहेत.
सीरीजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल असलेल्या Vivo X500 Pro Max च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटसाठी CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,14,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटसाठी CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,22,000 रुपये तर 12GB + 1TB व्हेरिअंटसाठी CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,29,000 रुपये मोजावे लागणार आहेत.
चीनमध्ये X500 आणि X500 Pro Max या फोन्सची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर X500 Pro ची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. X500 हा डॉन, एकोझ ऑफ द अर्थ, नाइट फोटोग्रफी आणि सनी या रंगांत उपलब्ध असेल, तर X500 Pro सीरीज सनसेट आणि डॉन या शेडमध्ये खरेदीसाठी मिळेल.
फीचर्सबाबत बोलायचं झालं तर X500 मध्ये 6.59-इंचाचा 1.5K म्हणजेच 1,260 x 2,750 पिक्सेल रिझोल्यूशनचा अमोलेड डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सँपलिंग रेट 300Hz आहे. या फोनला HDR सपोर्ट आणि IP68 + IP69 रेटिंग मिळते. यात 3nm प्रोसेसवर बनलेला ओक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M चिपसेट, G1 अल्ट्रा जीपीयू, V3+ ब्लूप्रिंट इमेजिंग चिप, 12GB एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे. कॅमेऱ्याबाबत या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.68) प्रायमरी, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड आणि 64-मेगापिक्सेल (f/2.55) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असून 3.1x ऑप्टिकल आणि 100x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट मिळतो. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल (f/2.0) कॅमेरा दिला आहे. या फोनला 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगसह 7,500mAh बॅटरी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर तसंच 5G, 4G एलटीई, जीपीएस, यूएसबी टाइप-सी, वायफाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी मिळते.
X500 Pro मध्ये 6.36-इंचाचा 1.5K म्हणजेच 1,216 x 2,660 पिक्सेल रिझोल्यूशनचा अमोलेड डिस्प्ले आहे, तर X500 Pro Max मध्ये 6.85-इंचाचा 2K म्हणजेच 1,440 x 3,168 पिक्सेल रिझोल्यूशनचा अमोलेड डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि पिक्सेल डेन्सिटी 507 पीपीआय आहे. या दोन्ही फोनमध्ये 2nm प्रोसेसवर बनलेला फ्लॅगशिप ग्रेड मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो चिपसेट असून याची पीक क्लॉक स्पीड 4.55GHz इतकी आहे. यासोबत माली-जी2-अल्ट्रा-एनएक्स जीपीयू, V3+ आणि VS1 ब्लूप्रिंट इमेज चिप्स, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळतो.
कॅमेऱ्याच्या बाबतीत या दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. X500 Pro मध्ये 64-मेगापिक्सेल (f/2.52) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे, तर Pro Max मध्ये तब्बल 200-मेगापिक्सेल (f/2.67) टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरीच्या बाबतीत X500 Pro मध्ये 6,510mAh तर X500 Pro Max मध्ये तब्बल 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.