रेनो इंडियाची ऑक्टोबरसाठी सणासुदीची ऑफर, डस्टरवर 2.05 लाख रुपयांपर्यंत फायदा
नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर Renault India ने Kwid, Triber, Kiger आणि Duster वर ऑफर जाहीर केली आहे.
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने कार आणि दुचाकी खरेदीला वेग आला आहे. नवीन कार घ्यायचा विचार करणाऱ्यांसाठी Renault India ने ऑक्टोबर 2026 साठी खास ऑफर आणली आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असल्याची माहिती आहे.
कंपनीच्या Kwid, Triber, Kiger आणि Duster या मॉडेल्सवर वेगवेगळ्या सवलती आणि फायदे मिळत आहेत. नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 2.05 लाख रुपयांपर्यंतचे फायदे ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट, Renault Li.V.E स्क्रॅपेज सपोर्ट, लॉयल्टी बेनिफिट आणि निवडक फायनान्स योजना यांचा समावेश आहे.
कुटुंबासाठी 7 सीटर एमपीव्ही हवी असेल तर Renault Triber हा महत्त्वाचा पर्याय आहे. Triber Ph2 VIN26 Authentic व्हेरियंटवर एक्सचेंजसाठी 10 हजार रुपये, Li.V.E स्क्रॅपेज प्रोग्रामअंतर्गत 25 हजार रुपये आणि 3 वर्षे किंवा 30 हजार किमीचा AMC मिळून एकूण 41 हजार रुपयांचा फायदा मिळतो.
Evolution व्हेरियंटवर 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज सपोर्ट, नॉन-रेनो कारसाठी 15 हजार रुपये एक्सचेंज बेनिफिट, 25 हजार रुपये स्क्रॅपेज बोनस आणि AMC असे फायदे आहेत. Techno आणि Emotion व्हेरियंटवर कॅश, एक्सचेंज, स्क्रॅपेज आणि AMC मिळून 71 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. MY26 Triber च्या Evolution, Techno आणि Emotion व्हेरियंटवर कॅश बेनिफिट आणि एक्सचेंज ऑफर मिळून 81 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
बजेट कार म्हणून लोकप्रिय असलेल्या Kwid वरही फायदे आहेत. Pre-NBI Kwid Authentic वर 25 हजार रुपयांची स्क्रॅपेज ऑफर आहे. Evolution आणि Techno व्हेरियंटवर कॅश, NBI प्राइस बेनिफिट आणि स्क्रॅपेज मिळून 40 हजार रुपयांपर्यंत फायदा आहे. Kwid Climber वर सर्वाधिक 55 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे. काही ऑनलाइन आणि ऑफलाइन युनिट्सवर कॅश बेनिफिट, NBI प्राइस बेनिफिट आणि स्क्रॅपेज यांचा त्यात समावेश आहे.
Kiger च्या Ph2 Authentic व्हेरियंटवर एक्सचेंज सपोर्ट, 25 हजार रुपयांचे Li.V.E स्क्रॅपेज बेनिफिट आणि AMC मिळून सुमारे 44 हजार रुपयांचा फायदा आहे. Evolution व्हेरियंटवर 49 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. Kiger Evolution+, Techno आणि Emotion व्हेरियंट्सवर Energy आणि Turbo पर्यायांनुसार 84 हजार रुपयांपर्यंत फायदे मिळत आहेत.
सर्वात मोठी ऑफर Duster वर आहे. नवीन Duster वर 10 हजार रुपयांचा लाभ मिळतो. Evolution आणि Adventure व्हेरियंटवर Duster ते Duster एक्सचेंज केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत, तर दुसऱ्या कारच्या एक्सचेंजवर 60 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. नॉन-रेनो कारच्या एक्सचेंजवर 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ आणि 3 वर्षे किंवा 30 हजार किमीचा AMC देण्यात आला आहे. Duster Techno+ आणि Iconic व्हेरियंटवर तब्बल 2.05 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळत असल्याची माहिती आहे.
ऑफरचे फायदे आणि अंतिम किंमत शहर, राज्य, स्थानिक कर, डीलर आणि कारच्या व्हेरियंटनुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदीपूर्वी जवळच्या Renault डीलरशीपकडून अंतिम किंमत आणि उपलब्ध ऑफरची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.