शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:31 IST

स्मार्टफोन वारंवार गरम होतोय? ब्राईटनेस, ॲप्स आणि लोकेशन सेटिंग तपासा

फोन सारखा गरम होत असेल तर फक्त जास्त वापर हे एकमेव कारण नसू शकतं. ब्राईटनेस, बॅकग्राऊंड ॲप्स, लोकेशन, नोटिफिकेशन आणि ऑटो-अपडेट यांच्या सेटिंगमध्ये बदल केल्यास ओव्हरहिटिंग कमी होऊ शकते.

स्मार्टफोन वारंवार गरम होतोय? ब्राईटनेस, ॲप्स आणि लोकेशन सेटिंग तपासा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग झाला आहे. त्याच्यामुळे आपली अनेक कामं चुटकीसरशी होतात. पण फोन अचानक गरम होऊ लागला की काय करावं ते अनेकांना सुचत नाही. बराच वेळ वापरला म्हणून डिव्हाईस गरम झालं असेल, असं अनेकांना वाटतं. मात्र प्रत्येक वेळी तेच एकमेव कारण असतं असं नाही. तुमचा फोन वारंवार गरम होत असेल, तर त्यामागची कारणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

पहिलं आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे स्क्रीनची ब्राईटनेस सतत फुल ठेवणं. आपण बराच वेळ ऊन्हात असलो की फोन वापरण्यासाठी ब्राईटनेस फुल करावी लागते. त्यामुळे डिस्प्ले पॅनल आणि प्रोसेसरवर लोड येतो आणि फोन जास्त वेगाने गरम होऊ लागतो. म्हणूनच तज्ज्ञ नेहमी सांगतात की ऑटो-ब्राइटनेस सेटिंग चालू करा. असं केलं की डिव्हाईस स्वतःच्या गरजेनुसार ब्राईटनेस ॲडजस्ट करतं आणि फोन जास्त गरम होत नाही.

दुसरं कारण म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले ॲप्स. हे ॲप्स सतत डेटा आणि बॅटरी, दोन्ही वापरत असतात. त्यामुळे प्रोसेसरला सतत काम करावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून फोन गरम होतो. यावर उपाय म्हणजे सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड ॲप्स रिफ्रेश करा आणि बॅटरीचा वापर तपासा. ज्या ॲप्सचा सतत वापर होत नाही, त्यांचं बॅकग्राऊंड रनिंग लगेच बंद करा.

लोकेशन आणि जीपीएस सतत चालू ठेवणंही फोन गरम होण्याला कारणीभूत ठरू शकतं. नकाशा किंवा राईडिंग ॲप्स, वेगवेगळे गेम्स आणि सोशल मीडिया ॲप्स तुमचं लोकेशन सतत ट्रॅक करत असतात. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ज्या ॲप्सची तुम्हाला खरंच गरज आहे, फक्त त्यांनाच लोकेशन ॲक्सेस द्या. बाकीच्या ॲप्ससाठी तो बंद करा.

नोटिफिकेशनचाही फोनच्या तापमानावर परिणाम होतो. सगळ्या ॲप्सचे नोटिफिकेशन चालू असतील, तर दर 5 मिनिटांनी फोनची स्क्रीन सुरू होते आणि त्यामुळे फोन गरम होऊ लागतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊन, ज्या ॲप्सचा सतत वापर होत नाही त्यांचे नोटिफिकेशन बंद करा. त्यामुळे फोनचं तापमान आटोक्यात ठेवता येतं.

शेवटचं कारण आहे ऑटो-अपडेट्स. फोन वायफायला कनेक्ट होताच ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये आपोआप अपडेट होऊ लागतात. त्याच वेळी गूगल किंवा क्लाऊड सिंकही सुरू होतं. म्हणजे एकाच वेळी अनेक कामांचा लोड स्मार्टफोनवर येऊ शकतो आणि फोन गरम होतो. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ऑटो-अपडेट मॅन्युअलवर सेट करा आणि डेटा सिंक तुमच्या गरजेनुसार चालू ठेवा.

थोडक्यात, स्क्रीनची ब्राईटनेस, बॅकग्राऊंड ॲप्स, लोकेशन आणि जीपीएस, नोटिफिकेशन आणि ऑटो-अपडेट्स या पाच गोष्टींच्या सेटिंगकडे लक्ष दिलं, तर फोन वारंवार गरम होण्याची समस्या कमी होऊ शकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ