मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:34 IST

विखे पाटील कुटुंबातील नीला यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत स्टॉकहोम मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत.

विखे पाटील कुटुंबातील नीला यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या निवडीबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पुतणीला शुभेच्छा दिल्या. "माझी पुतणी नीला विखे पाटील हिची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून झालेली निवड ही आमच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि स्वीडनमधील सार्वजनिक जीवनातील योगदानाची पावती आहे," असे ट्विट राधाकृष्ण विखे पाटील यांनी 20 सप्टेंबर 2026 रोजी केले.

नीला विखे पाटील सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक कामात सक्रिय राहिल्या आहेत. त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. "माझे बंधू अशोक पाटील यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जी मेहनत घेतली, तीच मेहनत आज नीला विखे पाटील यांच्या यशामागचे महत्त्वाचे कारण आहे. नीला आता स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून तिथल्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, याचा मला मनापासून आनंद आहे," असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

41 वर्षांच्या नीला विखे पाटील स्वीडनच्या 349 सदस्यांच्या संसदेत, म्हणजेच 'रिक्सडॅग'मध्ये, स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या विखे पाटील कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील असून त्यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला, पण त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या त्या मुलगी असून, जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळातील मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.

स्वीडनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 349 पैकी 176 जागा जिंकल्या, तर मावळत्या पुराणमतवादी सरकारला 173 जागांवर समाधान मानावे लागले. या राजकीय पार्श्वभूमीवर नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

नीला विखे पाटील यांचे शिक्षण स्वीडनच्या गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस इथे झाले. त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून त्यानंतर एमबीएची पदवीही मिळवली. त्या स्वीडनच्या 'ग्रीन पार्टी'कडून स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाल्या. यापूर्वी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या काळात त्या राजकीय सल्लागार म्हणूनही काम करत होत्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ