शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:09 IST

व्हॉट्सॲपवर मेसेज आता ठरावीक वेळी आपोआप जाणार, नवं शेड्यूल्ड मेसेज फीचर येतंय

व्हॉट्सॲप शेड्यूल्ड मेसेज फीचरवर काम करत आहे. मेसेज, लिंक, फोटो किंवा व्हिडीओ ठरवलेल्या वेळी आपोआप पाठवता येईल.

व्हॉट्सॲपवर मेसेज आता ठरावीक वेळी आपोआप जाणार, नवं शेड्यूल्ड मेसेज फीचर येतंय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एखाद्याला ठरावीक वेळी मेसेज करायचा असतो, पण तेवढ्यात आपण विसरतो किंवा फोन बंद असतो, असं अनेकदा घडतं. अशा वेळी अनेक अडचणी निर्माण होतात. यूजर्सची नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे शेड्यूल्ड मेसेज फीचर सध्या काही अँड्रॉईड बीटा यूजर्ससोबत तपासलं जात आहे, असं सांगितलं जात आहे.

येत्या काही आठवड्यांत हे फीचर यूजर्ससाठी उपलब्ध केलं जाणार आहे. मेसेज हाताने पाठवण्याऐवजी ठरावीक वेळेसाठी मेसेज, लिंक, फोटो किंवा व्हिडीओ शेड्यूल करण्याचा पर्याय त्यात मिळेल. हे फीचर पर्सनल आणि ग्रुप, दोन्ही चॅटमध्ये चालू शकतं. मेसेज शेड्यूल केल्यानंतर पाठवणारा ऑफलाईन असला, तरी ठरलेल्या वेळी तो आपोआप पाठवला जाईल. शिवाय तो पाठवला जाण्यापूर्वी डिलीटही करता येईल.

व्हॉट्सॲप बीटा फॉर अँड्रॉईडच्या 2.26.40.7 या वर्जनवर असलेल्या काही यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केलं जात आहे. मेसेज शेड्यूल करण्यासाठी आधी चॅटमध्ये मेसेज टाईप करावा लागेल. त्यानंतर सेंड बटन थोडा वेळ दाबून ठेवायचं. फीचर उपलब्ध असेल, तर मेसेज पाठवण्यासाठी तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय व्हॉट्सॲप दाखवेल.

यूजर्स 10 मिनिटांनंतरपासून ते 2 आठवड्यांपर्यंत मेसेज शेड्यूल करू शकतील. हे फीचर टेक्स्ट मेसेज, लिंक्स, फोटो आणि व्हिडीओला सपोर्ट करतं. मात्र एका वेळी फक्त एकच फोटो किंवा व्हिडीओ शेड्यूल करता येणार आहे. फोटो शेड्यूल करण्यापूर्वी ड्रॉइंग एडिटरमध्ये जाऊन तो एडीट करता येतो, तसंच त्याला कॅप्शनही जोडता येतं.

तुम्ही निवडलेल्या वेळी व्हॉट्सॲप तो मेसेज आपोआप पाठवेल. त्या वेळी ॲप बंद असलं किंवा पाठवणारा ऑफलाईन असला, तरी काही फरक पडणार नाही. ग्रुप चॅटमध्येही हे फीचर चालण्याची शक्यता आहे. पण मेसेज शेड्यूल करताना जे यूजर्स ग्रुपचा भाग होते, फक्त त्यांनाच तो जाईल. म्हणजेच मेसेज शेड्यूल केल्यानंतर ग्रुपमध्ये जोडल्या गेलेल्या यूजर्सना तो मिळण्याची शक्यता कमी आहे.

चॅट इन्फो स्क्रीनवर यूजर्सना एक डेडिकेटेड सेक्शनही मिळू शकतो. मेसेज पोहोचण्यापूर्वी तो पाहण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी त्याचा वापर होईल. एखाद्या यूजरने शेड्यूल केलेला मेसेज डिलीट केला, तर समोरच्या व्यक्तीला त्याची कोणतीही नोटिफिकेशन मिळणार नाही. शेड्यूल्ड मेसेजेस फीचरमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा सपोर्टही मिळण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ