मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:47 IST

जागतिक पर्यटन दिन: महाराष्ट्र पर्यटन विभागाची AI चॅटबोट, डिजिटल तिकिटांकडे वाटचाल

महामुनी चॅटबोटपासून स्मार्ट पार्किंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटनाला डिजिटल स्वरूप देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

जागतिक पर्यटन दिन: महाराष्ट्र पर्यटन विभागाची AI चॅटबोट, डिजिटल तिकिटांकडे वाटचाल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

जागतिक पर्यटन दिन २०२६ निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटनाला डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याचं काम सुरू केलंय. यंदाच्या पर्यटन दिनाची थीमच 'डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्कल्पना' अशी आहे, आणि त्याला अनुसरून विभागाने वेगवेगळे डिजिटल प्रोजेक्ट हाती घेतले आहेत.

यात डिजिटल डॅशबोर्ड, स्मार्ट तिकिटिंग, 'महाअतिथी' वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, AI वर आधारित 'महामुनी' चॅटबोट, स्मार्ट पार्किंग आणि डिजिटल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा गोष्टींचा समावेश आहे. उद्देश एकच - पर्यटकांना जास्त सोपा, सुरक्षित आणि पर्सनलाईज्ड अनुभव देणं.

पर्यटन विभागाचं वेबसाईट सध्या राज्यातील सगळी पर्यटनस्थळं, जिल्हे, ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा, बीच, निसर्गरम्य जागा, धार्मिक स्थळं, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम याबद्दलची माहिती एकाच ठिकाणी देतं. पुढच्या काळात याच वेबसाईटवर डिजिटल डॅशबोर्ड जोडला जाणार आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवरची रिअल-टाइम स्थिती समजणं आणि त्यानुसार निर्णय घेणं सोपं होईल.

'महाअतिथी' हे वेबसाईटही याच दिशेने काम करतंय. पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रातले लोक यांच्यातला दुवा म्हणून हे पोर्टल काम करतं. यावर होमस्टे, बेड अँड ब्रेकफास्ट (B&B), हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कृषी पर्यटन केंद्रं, फार्म स्टे, व्हिला अशा वेगवेगळ्या राहण्याच्या पर्यायांची आणि टूर्सची माहिती मिळते, शिवाय डायरेक्ट बुकिंगची सोयही आहे.

याशिवाय अधिकृत 'Maharashtra Tourism' मोबाईल अ‍ॅप बनवलं जाणार आहे. या अ‍ॅपमधून पर्यटनस्थळांची माहिती, नकाशे-मार्गदर्शन, ट्रिप प्लॅनिंग, हॉटेल-सर्व्हिस बुकिंग, तिकीट रिझर्व्हेशन, इव्हेंट्स, लोकल एक्सपिरियन्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आणि फीडबॅक द्यायची सोयही मिळेल. "One App - Complete Maharashtra Tourism Experience" हे या अ‍ॅपमागचं उद्दिष्ट आहे.

AI चा वापर करणारा 'महामुनी' चॅटबोट हे या सगळ्यातलं आणखी एक महत्त्वाचं फीचर. या चॅटबोटमधून पर्यटकांना पर्यटनस्थळं, धार्मिक-आध्यात्मिक ठिकाणं, टुरिझम सर्किट, रस्ते, तिकिटं, राहण्याची सोय, इव्हेंट्स याबद्दलची माहिती फास्ट, पर्सनल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळू शकते. पर्यटकाची आवड, वेळ, बजेट आणि ट्रिपचा उद्देश बघून चॅटबोट स्वतःच ट्रिप प्लॅन करून द्यायला मदत करणार आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करणारे लोक, लोकल बिझनेसमन आणि सर्व्हिस देणाऱ्यांना डिजिटल स्किल्स शिकवण्यासाठी डिजिटल क्षमता-विकास कार्यक्रमही राबवला जाणार आहे. यात डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाइन बुकिंग सिस्टिम, डिजिटल पेमेंट, AI, कंटेंट क्रिएशन, सायबर सिक्युरिटी अशा विषयांचा समावेश असेल. "Empowering Local Communities through Digital Tourism" हा या उपक्रमामागचा विचार आहे.

जास्त गर्दी होणाऱ्या पर्यटनस्थळांवर सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी CCTV सिस्टिम आणि स्मार्ट एन्ट्री गेट्स बसवण्याचाही विचार सुरू आहे. CCTV मुळे सुरक्षा आणि गर्दीच्या स्थितीवर लक्ष ठेवता येईल, तर स्मार्ट गेट्समधून QR कोड किंवा डिजिटल तिकिटांच्या आधारे पटकन आणि कॉन्टॅक्टलेस एन्ट्री मिळेल. धार्मिक स्थळं, किल्ले, म्युझियम आणि मोठे पर्यटन प्रोजेक्ट्स इथे टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू केली जाईल.

कोल्हापूरचं उदाहरण बघितलं तर, तिथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक-पर्यटक येतात आणि नवरात्रोत्सवासारख्या सणांमध्ये ही गर्दी आणखी वाढते, त्यामुळे पार्किंग आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. यावर उपाय म्हणून पर्यटन विभागाने कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात स्मार्ट पार्किंग सिस्टिम सुरू केली आहे. मोबाईल अ‍ॅपवरून पार्किंगची जागा उपलब्ध आहे का हे बघता येतं, आणि अ‍ॅप किंवा QR कोडने आधीच पार्किंग बुक करण्याचीही सोय आहे. पार्किंगची माहिती रिअल-टाइम अपडेट होत असल्याने तिथे पोहोचण्याआधीच स्थिती कळते.

पर्यटन क्षेत्राशी संबंधित परवानग्या, नोंदणी आणि सर्टिफिकेट्स सोप्या पद्धतीने मिळावेत यासाठी पर्यटन विभागाच्या १० सेवा MAITRI 2.0 पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात पर्यटन धोरणाअंतर्गत वर्गीकरण प्रमाणपत्र, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (MSME) पर्यटन प्रकल्पांसाठी पात्रता प्रमाणपत्र, मेगा आणि अल्ट्रा मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता, मुद्रांक शुल्क सवलत, तसंच कृषी पर्यटन, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम आणि कॅराव्हॅन पर्यटनाची नोंदणी यांसारख्या सेवांचा समावेश आहे. व्हिला, अपार्टमेंट, होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट उपक्रमांची नोंदणीही यावर करता येते. जास्त माहितीसाठी https://maharashtratourism.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देता येईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ