मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघाची 150 किलोमीटरची भटकंती

नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघाची 150 किलोमीटरची भटकंती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
समाज PT24 टीम

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील साडेतीन वर्षांचा नर वाघ अधिवासाच्या शोधात पेंच व्याघ्र प्रकल्पापर्यंत पोहोचला आहे. दोन जंगलांना जोडणारा चांगला वन्यजीव कॉरिडॉर तयार होत असल्याची चिन्हे यातून दिसत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील साडेतीन वर्षांच्या एका नर वाघाने तब्बल दीडशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमींचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. स्वतःचा अधिवास शोधण्यासाठी हा वाघ उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातून निघाला आणि थेट पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पापर्यंत पोहोचला.

वाघ मोठे झाले की आईपासून वेगळे होतात आणि स्वतःचा इलाखा तयार करतात. त्यासाठी ते आपण जन्मलेल्या जंगलापासून बरेच लांब जातात. हा वाघही त्याच वाटेने गेला आहे.

हा वाघ उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील F2 वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी एक आहे. हे अभयारण्य नागपूर आणि भंडारा यांच्या सीमेवर वसलेले आहे. पाचही बछड्यांपैकी सर्वात शेवटपर्यंत तोच आईसोबत राहिला होता. त्याचा जन्म अभयारण्यातील 'गोठणगाव' जंगलात झाला. आता त्याने तिथून 150 किलोमीटर लांब असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील 'चोरबाहुली' जवळ मुक्काम ठोकला आहे.

नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व टोकाला उमरेड कऱ्हांडला अभयारण्य आहे. तिथून निघालेला हा वाघ जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील पेंच जंगलातल्या चोरबाहुलीपर्यंत गेला. ही सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. वाघ आपल्या अधिवासाच्या शोधात शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात, हे यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

या संपूर्ण प्रवासात वाघाने कुठेही मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे किंवा पशुधनाचे नुकसान केल्याचे वृत्त अद्याप नाही. त्यामुळे उमरेड कऱ्हांडला आणि पेंच या दोन्ही वनक्षेत्रांना जोडणारा चांगला वन्यजीव कॉरिडॉर आणि अधिवास तयार होत असल्याची चिन्हे यातून दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

29 ऑक्टोबरला हा वाघ चोरबाहुली जवळ दिसला. तेव्हापासून वनविभागाचे पथक सतत त्याच्यावर नजर ठेवून आहे. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातून आलेला हा पाहुणा पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातच आपला अधिवास तयार करणार की आणखी पुढे मध्य प्रदेशाच्या दिशेने निघून जाणार, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

काहीही असले तरी या भटकंतीमुळे नागपूर जिल्ह्यात वाघ बिनधास्तपणे फिरतात एवढेच नाही, तर एका जंगलातून दुसऱ्या जंगलापर्यंत वाघांसाठी चांगला वन्यजीव कॉरिडॉर तयार होत असल्याचा पहिला पुरावाही या घटनेतून मिळाला आहे.

#नागपूर#समाज#PT24#Society#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ