मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

सणासुदीत कमाईची मोठी संधी! भारतात लाखो नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणार; कुठे मिळणार सर्वाधिक संधी?

जुलै ते डिसेंबर २०२६ दरम्यान देशात दोन लाख ते अडीच लाख हंगामी आणि गिग नोकऱ्या तयार होणार असल्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.

सणासुदीत कमाईची मोठी संधी! भारतात लाखो नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणार; कुठे मिळणार सर्वाधिक संधी?
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

देशात एका बाजूला रोजगाराचा प्रश्न कायम असताना, दुसऱ्या बाजूला सणासुदीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं समोर आलं आहे. जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीत भारतात दोन लाख ते अडीच लाख हंगामी आणि गिग नोकऱ्या तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच सणासुदीच्या काळात एकूण नोकरभरतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

हा अंदाज जागतिक तंत्रज्ञान आणि डिजिटल टॅलेंट सोल्युशन्स पुरवणाऱ्या एनएलबी सर्व्हिसेस या कंपनीच्या एका अहवालातून समोर आला आहे. ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांत तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गिग वर्कर्स असं म्हटलं जातं. अहवालानुसार, देशात सणासुदीचा हंगाम सुरू होत असताना ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, रिटेल, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, प्रवास आणि ग्राहक सेवा या क्षेत्रांतील कंपन्या वर्षभरातील सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक मागणीच्या काळासाठी तयारी करत आहेत.

यंदा कंपन्यांनी नोकरभरतीची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. पारंपरिक पद्धतीने भरती करण्याऐवजी आता तंत्रज्ञानावर आधारित आणि गरजेनुसार पटकन तैनात करता येईल असं मनुष्यबळ उभं करण्यावर कंपन्यांचा भर वाढला आहे. यामागचं कारण असं की सणासुदीच्या हंगामात कामाचा वेग अचानक वाढतो आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ पारंपरिक भरती केंद्रांमधून वेळेत उभं करणं कठीण जातं, त्यामुळे कंपन्या आता आधीपासूनच तयार असलेल्या आणि लगेच कामाला लावता येईल अशा कर्मचाऱ्यांवर भिस्त ठेवत आहेत.

सणासुदीतील मागणी पूर्ण करण्यासाठी होणारी ही भरती आता केवळ तात्पुरती गरज राहिलेली नाही. नव्या उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचं, मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कामाच्या क्षमतेची पडताळणी करण्याचं आणि पुढे कायमस्वरूपी नोकरीची संधी देण्याचं एक साधन म्हणूनही या भरतीकडे पाहिलं जात आहे. म्हणजेच सणासुदीत तात्पुरत्या स्वरूपात कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांना पुढे कंपनी कायमस्वरूपी नोकरीतही सामावून घेऊ शकते.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कंपन्या सणासुदीतील सर्वाधिक मागणीच्या सुमारे बारा ते चौदा आठवडे आधीपासूनच आपल्या मनुष्यबळाच्या नियोजनाला सुरुवात करतात. यामुळे आयत्या वेळी होणारी भरतीची घाई आणि ताण कमी होण्यास मदत होते. या भरतीचा विस्तार आता केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एकूण सणासुदीच्या भरतीच्या मागणीपैकी सुमारे पंचेचाळीस टक्के मागणी टियर टू आणि टियर थ्री शहरांमधून येण्याची शक्यता असून, या शहरांमध्ये भरतीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, संघटित रिटेल आणि प्रादेशिक ऑर्डर डिलिव्हरी नेटवर्कच्या विस्तारामुळे जयपूर, लखनौ, इंदूर, सुरत, नागपूर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, चंदीगड आणि कोची या शहरांमध्ये रोजगाराची मागणी वाढताना दिसत आहे. अहवालानुसार, पहिल्यांदाच काम करणारे तरुण आणि महिला सणासुदीच्या हंगामातील नोकरभरतीत महत्त्वाचा वाटा उचलताना दिसत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ