सणांच्या गर्दीत त्वचेची काळजी घ्यायची कशी? बॅगेत ठेवा हे पाच स्किन केअर प्रॉडक्ट्स
सणासुदीच्या दिवसांत बाहेर फिरताना उन्हाचा चटका, घाम, धूळ आणि प्रदूषण यांचा त्वचेवर परिणाम होतो. अशा वेळी बॅगेत नेमके काय ठेवावे, याबद्दल जॉय पर्सनल केअरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पौलोमी रॉय यांनी माहिती दिली आहे.
सण जवळ आले की आपली तयारी ठरलेली असते. आवडता ड्रेस काढून ठेवणे, मॅचिंग दागिने शोधणे आणि फोटोसाठी फोन फुल चार्ज करून ठेवणे, या गोष्टी आधीच पक्क्या होतात. पण या सगळ्या तयारीत एक गोष्ट नेहमी मागे राहते, ती म्हणजे त्वचेची काळजी. सप्टेंबरपासून सणांचा सीझन सुरू होतो आणि या काळात बाहेरचे कार्यक्रम, गर्दीचे रस्ते, कडक ऊन, दमट हवामान, घाम आणि प्रदूषण यांचा सामना करावा लागतो. शिवाय सेल्फीसाठी सतत थांबावं लागतं ते वेगळंच. अशा वेळी काही बेसिक स्किन केअर गोष्टी बॅगेत ठेवल्या तर त्वचा ताजी आणि हायड्रेटेड राहायला मदत होते.
जॉय पर्सनल केअर (RSH ग्लोबल) या कंपनीच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पौलोमी रॉय यांनी सणासुदीच्या काळात बॅगेत ठेवाव्यात अशा पाच आवश्यक स्किन केअर गोष्टींची माहिती दिली आहे.
सगळ्यात आधी नंबर येतो तो सनस्क्रीनचा. दुपारी पंडालला भेट द्यायची असेल, बाहेर जेवायला जायचं असेल किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी शहरातून फिरायचं असेल, तर या सगळ्या वेळी त्वचेचा उन्हाशी थेट संपर्क येतो. त्यामुळे बॅगेत SPF 50 असलेलं सनस्क्रीन ठेवणं आणि ते वारंवार पुन्हा लावणं ही सवय सणासुदीच्या दिनचर्येचा भाग बनवावी, असं रॉय सांगतात. त्यांच्या मते, त्वचेवर पांढरा थर न साचणारं आणि तेलकटपणा कमी करणारं सनस्क्रीन विशेष उपयोगी पडतं, कारण ते कोणताही दृश्य थर न ठेवता संरक्षण देतं आणि त्वचा फोटोसाठी नेहमी तयार ठेवतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची बाटली. कार्यक्रमांमध्ये फिरताना पाणी पिणं अनेकदा विसरलं जातं. त्यामुळे बॅगेत पाण्याची बाटली ठेवावी आणि विशेषतः बाहेर असताना, चालताना किंवा उन्हात जास्त वेळ घालवताना नियमित पाणी पिण्याची सवय ठेवावी, असं रॉय म्हणतात. ही कदाचित बॅगेतील सगळ्यात आकर्षक वस्तू नसेल, पण पुरेसं पाणी प्यायल्यामुळे सणासुदीच्या मोठ्या दिवसात ताजेतवाने राहता येतं.
तिसरी गोष्ट म्हणजे वेट वाइप्स. घाम, धूळ, प्रदूषण आणि दिवसभराची धावपळ यामुळे त्वचा लवकर निस्तेज किंवा अस्वच्छ वाटायला लागते. चेहरा पूर्ण धुण्यासाठी वेळ नसतो तेव्हा सौम्य वेट वाइप्स जवळ ठेवावेत, असा सल्ला रॉय देतात. एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमाकडे जाताना, पुढचा सेल्फी काढण्यापूर्वी किंवा जेवणाआधी फ्रेश होण्यासाठी हे उपयोगी पडतात.
चौथी गोष्ट म्हणजे फेस वॉश. बाहेर बराच वेळ घालवल्यानंतर त्वचेवर घाम, धूळ, अतिरिक्त तेल आणि वातावरणातील अशुद्धींचा थर साचतो. त्यामुळे बॅगेत एक कॉम्पॅक्ट फेस वॉश ठेवणं फायद्याचं ठरतं, असं रॉय सांगतात. उन्हामुळे त्वचा काळवंडली किंवा निस्तेज वाटली, तर केशर, हळद आणि चंदन असलेला सौम्य फेस वॉश वापरावा, कारण हे पारंपरिक घटक टॅनिंग कमी करणे, त्वचेची सौम्य स्वच्छता करणे आणि नैसर्गिक तजेला परत आणणे यासाठी उपयुक्त ठरतात, असं त्या नमूद करतात. दिवसभर बाहेर फिरून थकलेल्या त्वचेसाठी हे विशेष गुणकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.