सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

तुळजापूरकडे पायी निघालेल्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग बायपासजवळ गुरुवारी सकाळी भरधाव कंटेनरने पायी चाललेल्या भाविकांना मागून धडक दिली. या अपघातात बसवकल्याणच्या ३० वर्षीय भाविकाचा जागीच मृत्यू झाला.

तुळजापूरकडे पायी निघालेल्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांच्या एका समूहाला भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. देवीचे दर्शन अवघ्या काही तासांच्या अंतरावर असतानाच ही घटना घडल्याने धाराशिव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसवकल्याण येथून काही भाविकांचा समूह आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी निघाला होता. हे सगळे जण तुळजापूरच्या दिशेने चालत मुंबई-हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ पोहोचले. त्याच वेळी हैदराबादहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव कंटेनरच्या चालकाचे गाडीवरचे नियंत्रण अचानक सुटले.

नियंत्रण सुटलेला हा कंटेनर रस्त्याने पायी चालणाऱ्या भाविकांच्या घोळक्यात शिरला आणि त्यांना जोरात धडकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावर एकच तारांबळ उडाली.

या अपघातात बसवकल्याण येथील रहिवासी असलेले गुरुसिद्ध बाबुराव कुंभार (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबतचे इतर सहा भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायांना तीव्र दुखापती झाल्या आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी धावले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने लगेच नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरून तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला आहे. रात्री किंवा पहाटेच्या वेळी महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे भाविकांच्या जिवाला सतत धोका निर्माण होत आहे. म्हणून वाहनचालकांनी तसेच पायी प्रवास करणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ