बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 105 | Moderate 00:45 IST

तुळजाभवानी मंदिरात MSF जवानांकडून भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल

धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी भाविकांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून भाविकांमध्ये तीव्र संताप आहे.

तुळजाभवानी मंदिरात MSF जवानांकडून भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी केलेल्या कथित गैरवर्तणुकीवरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षारक्षक भाविकांना धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकांबद्दल भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना सुरक्षा दलाकडून धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दर्शन घेण्याआधीच भाविकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाविक करत आहेत.

तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही अशी वागणूक मिळत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. सुरक्षारक्षकांवर कडक कारवाई व्हावी, असे भाविकांचे म्हणणे आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भाविकांना झालेल्या धक्काबुक्कीचा आणि सुरक्षारक्षकांच्या वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याआधीही पोलीस आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. तुळजाभवानी मंदिरातील पितळी दरवाजातून प्रतिबंधित प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे मंदिर संस्थानचे सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात मोठा राडा झाला होता. पोलिसांनी सुरक्षारक्षकाला कथितपणे मारहाण केल्याने त्याचे डोके फुटले होते. त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

आता एकीकडे मंदिरातील सुरक्षारक्षक भाविकांशी उद्धटपणे वागत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे पोलीस आणि सुरक्षारक्षक यांच्यातील अंतर्गत वाद समोर आला आहे. म्हणजे एका बाजूला भाविक आणि सुरक्षारक्षक, तर दुसऱ्या बाजूला पोलीस आणि सुरक्षारक्षक असे दोन वेगळे वाद चर्चेत आहेत. या दोन्ही प्रकरणांचे व्हिडिओ समोर आल्याने मंदिर प्रशासनाच्या सुरक्षेच्या आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भाविकांनी आणि स्थानिक संघटनांनी अशा उद्धट कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाचे जे दावे केले आहेत, त्यांच्यावरच आता शंका घेतली जात आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ