ट्रम्प यांना तीन अमेरिकन टीव्ही चॅनेल्सचा व्हाईट हाऊस प्रवेश बंदी; कोर्टात याचिका
CNN, MSNOW आणि POLITICO या तीन टीव्ही चॅनेल्सचे व्हाईट हाऊस प्रवेश पासेस ट्रम्प यांनी रद्द केल्यानंतर अमेरिकेत नवा वाद सुरु झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी CNN, MSNOW आणि POLITICO या तीन टीव्ही चॅनेल्सचा व्हाईट हाऊसमधील प्रवेश बंद केला. त्यापाठोपाठ १९ सप्टेंबर २०२६ रोजी या तिन्ही चॅनेल्सच्या पत्रकारांचे प्रवेश पासेस प्रत्यक्षात रद्द करण्यात आले. यामुळे अमेरिकेत एक नवा वाद उभा राहिला आहे.
ही बंदी घालताना ट्रम्प यांनी सांगितले की, बंदी घातलेले हे चॅनेल्स त्यांच्याविरोधात खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात, तसेच त्यांची बदनामी करतात, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे बंदी घातलेल्या चॅनेल्सनी आपली बाजू मांडताना म्हंटले आहे की, अमेरिकेच्या संविधानातील पहिले मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ट्रम्प यांनी नेमकं त्यावरच घाला घातला आहे.
या तिन्ही चॅनेल्सनी अमेरिकेच्या कोर्टात ट्रम्प यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. याआधी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनीही एका पत्रकाराला केवळ एका कार्यक्रमासाठी बंदी घातली होती, तेव्हा मीडिया आणि जनतेच्या दबावामुळे ओबामा यांना ती बंदी मागे घ्यावी लागली होती.
यावरून अमेरिकेत पत्रकारितेवर पूर्णपणे गदा आणणे शक्य नाही, असं बोललं जातंय. उलट भारतात एकाही पत्रकाराची किंवा मीडिया हाऊसची राजकीय नेत्यांवर बंदी घालण्याची किंवा त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊन केस लढण्याची हिंमत आहे का, अशी चर्चा आता विरोधी पक्षातील नेते करू लागले आहेत.
पत्रकारितेतील मूल्ये, दर्जा आणि खरा आवाज टिकवण्यासाठी अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकन मीडिया लढत असते. स्वतंत्र पत्रकारितेसाठी अमेरिकन लोक वेळ आल्यास सरकारशी दोन हात करतात, असं अनेक प्रसंगांतून दिसून आलं आहे. भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये शोध पत्रकारिता मुख्य प्रवाहात नसली, तरी अमेरिकेत मात्र ती अजूनही मुख्य प्रवाहात आहे. मात्र अमेरिकेत वाढत्या इस्रायली लॉबीचं वर्चस्व पाहता भांडवलशाहीपासून मीडियापर्यंत इस्रायलधार्जिणी लॉबी काम करत असल्याचं आणि त्या विचारधारेच्या सरकारसाठी काम करण्याचा प्रयत्न सतत होत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. तरीही अमेरिकन मीडिया अजून पूर्णपणे सरकारच्या ताब्यात गेलेली नाही, असंही दिसून येतं.
सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे, आपल्याला हवे तसे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना पसंती देणे आणि आपल्या मताशी सहमत होणाऱ्या लोकांची आवड असणे, हा ट्रम्प यांचा स्वभाव आहे. पण अमेरिकेतील सर्वच टीव्ही प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्यावर पूर्ण बंदी घातल्याने आणि त्यांचं आवडतं फॉक्स हे चॅनेलही या बंदीत सामील झाल्याने टीव्हीवर ट्रम्प यांचं दिसणंच पूर्णपणे बंद झालं आहे. लगेच हा वाद मिटवून परिस्थिती पूर्वीसारखी केली, तर आपला इगो दुखावला जाईल, या भीतीने ट्रम्प बंदी रद्द करणार नाहीत, त्यामुळे त्यांची गोची आणि घालमेल सुरु झाली आहे.
ट्रम्प यांच्यावरील ही बंदी फक्त टीव्हीवर दिसणाऱ्या प्रसारमाध्यमांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे प्रिंट मीडिया, खाजगी यूट्यूब चॅनेल्स, फोटो पत्रकार आणि रेडिओ यांनी त्यांचं कव्हरेज सुरुच ठेवलं आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरु केलं आहे, मात्र त्याची पोहोच आणि प्रेक्षकसंख्या अजून मोठी नसल्याने अमेरिकन जनतेचं त्याकडे सध्या तरी दुर्लक्ष आहे.